Homeकल्चर +मुलुंडमध्ये उद्या 'दिवाळी...

मुलुंडमध्ये उद्या ‘दिवाळी पहाट’!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे आज, २१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम झाला. उद्या मुंबईच्या कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे दिवाळी पहाट, या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.

दादर येथे आयोजित कार्यक्रमात जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगुळकर व मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट व भावगीतांवर आधारीत ‘दिवाळी पहाट त्रिवेणी संगीत’ या विशेष संकल्पनेवर करण्यात आला होता. ख्यातनाम गायक दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, प्रसिद्ध गायिका शाल्मली सुखटणकर, सोनाली कर्णिक, निवेदक अमित काकडे यांनी हे सादरीकरण केले.

कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांचा ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’ या विशेष संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर व प्राजक्ता सातर्डेकर यात सहभागी होतील. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे असून, संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे आहे.

हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content