Homeब्लॅक अँड व्हाईटमातृदिनानिमित्त डायना पेण्टीचा...

मातृदिनानिमित्त डायना पेण्टीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

आईप्रती अविरत प्रेम, काळजी व अभिजातपणा व्‍यक्‍त करण्‍यासाठी गुलाबासारखी सुरेख व प्रतिकात्‍मक गोष्‍ट दुसरी कोणतीच नाही. यंदा मातृदिनानिमित्त द बॉडी शॉपने डायना पेण्‍टीसोबत हृदयस्‍पर्शी व्हिडि‍ओ मोहिम लाँच केली. यामध्ये त्‍यांची आयकॉनिक ब्रिटीश रोझ श्रेणी आहे, जी आपल्‍या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण महिला म्‍हणजेच आईला सन्‍मानित करण्‍यासोबत तिची काळजी घेण्‍यासाठी परिपूर्ण आहे.

या जाहिरातीतली संकल्‍पना मातृदिनामागील भावनेला सुरेखरित्‍या कॅप्‍चर करते. जाहिरातीच्‍या सुरूवातीला डायना पेण्‍टीला टेक्‍स्‍चर्ड कलाकृती तयार करण्‍यास प्रेरणा मिळते. त्यामध्‍ये ती आपल्‍या आईच्‍या आठवणींना उजाळा देत स्‍वत:च्‍या कलाकृतीमधून गुलाब तयार करते. हाताने चिकणमातीसह कलाकृती तयार करत असताना तिला तिच्‍या आईचे प्रेम आणि काळजी (केअर)ची आठवण येते. ती दावा करते की गुलाब मातांसाठी आहेत, ज्‍यामध्‍ये प्रेम, कोमलता व आशीर्वाद सामावलेले आहेत, जे फक्‍त आईशीच जोडले जाऊ शकतात.

आपल्‍या निसर्गप्रेरित फुलांच्‍या सुगंधासाठी ओळखली जाणारी आयकॉनिक बाथ व बॉडीकेअर ब्रिटीश रोझ श्रेणी मातांना सन्‍मानित करण्‍यासाठी परिपूर्ण आहे. इंग्‍लंडमधील हाताने निवडण्‍यात आलेल्‍या गुलाबांचे सार समाविष्‍ट असलेले ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट आणि हँड क्रीम ४८-तास हायड्रेशन देतात,

डायना पेण्टी

ज्‍यामधून मुली व मातांना सर्वोत्तम पॅम्‍परिंग अनुभवाची खात्री मिळते. या जाहिरातीचा भाग म्‍हणून द बॉडी शॉप सर्वांना त्‍यांच्‍या मातांना लक्‍झरीअस ब्रिटीश रोझ श्रेणीसह अविरत प्रेम, केअर व पॅम्‍परिंग गिफ्ट करण्‍याचे आवाहन करते. 

द बॉडी शॉप साऊथ एशियाच्‍या प्रॉडक्‍ट, मार्केटिंग अँड डिजिटलच्‍या उपाध्‍यक्ष हरमीत सिंग म्‍हणाल्‍या की, आमची ब्रिटीश रोझ श्रेणी जगभरातील मातांच्या निरंतर मोहकता व सौंदर्याला मानवंदना आहे. यंदा मातृदिनानिमित्त आही सर्वांना द बॉडी शॉपची निसर्गप्रेरित, वेगन उत्‍पादने गिफ्ट करत आईप्रती त्‍यांचे प्रेम व प्रशंसा व्‍यक्‍त करण्‍याचे आवाहन करतो. चला तर मग, आपले पालनपोषण केलेल्‍या मातांना गुलाबांच्‍या सौम्‍य अनुभवासह उत्‍साहित करूया, ज्‍यामध्‍ये प्रेम, केअर व ताकदचे सार सामावलेले आहे.

अभिनेत्री डायना पेण्‍टी म्‍हणाल्‍या की, माझी आई नेहमी माझी संरक्षक, स्‍वर्ग आहे. तिच्‍याजवळ असताना मी माझ्या सर्व चिंता विसरून जाते आणि तिच्‍या सहवासात प्रेम मिळते. मला दररोज तिचे आभार मानण्‍यासोबत कौतुक करायला मिळत नाही, पण द बॉडी शॉपची मोहिम तिच्‍यासाठी आणि इतर सर्व मातांसाठी प्रेमपत्र आहे. ब्रिटीश रोझ कलेक्‍शन निश्चितच तिच्‍यासाठी सर्वोत्तम गिफ्ट आहे, ज्‍यामुळे मी जवळ नसतानादेखील ती स्‍वत:ला पॅम्‍पर करू शकते.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content