Homeब्लॅक अँड व्हाईट"धर्मवीर २"चा बॉक्सऑफिसवर...

“धर्मवीर २”चा बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक धमाका

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला. २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. १५००पेक्षाही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.

धर्मवीर

चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद, श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मनात चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही, असे जाणकार सांगतात.

धर्मवीर

धर्मवीर २, या चित्रपटाची अजून एक विशेष बाब म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांची अगदी हुबेहूब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळत आहे. पडद्यावर मुख्यमंत्र्यांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेकमध्ये मुख्यमंत्र्यांचा तो सीन शूट झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content