Homeबॅक पेजशाहरूख खानबरोबर डेन्‍वरची...

शाहरूख खानबरोबर डेन्‍वरची आता नवीन मोहीम

भारतातील प्रतिष्ठित मेन्‍स ब्रँड डेन्‍वरने त्‍यांच्‍या ‘सक्‍सेस’ मोहिमेच्‍या विस्‍तारीकरणाचा लाँच केले असून त्यात मेगास्‍टार व ब्रँड अॅम्‍बेसेडर शाहरूख खान आहे. यशस्‍वी झाल्‍याने सद्गुणांकडे दुर्लक्ष केले जाणाऱ्या युगामध्‍ये ही मोहिम आमूलाग्र परिवर्तनाला प्रेरित करत दुर्मिळ उपलब्‍धींमधील यशाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. ब्रँड जाहिरात साध्‍या, पण प्रबळ कथानकाच्‍या माध्‍यमातून मार्मिक संदेश देते.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान ग्रेटेस्‍ट ऑफ ऑल टाइम्‍स आणि यशाचे खरे आयकॉन म्‍हणून ओळखला जातो. सरळसाध्‍या पार्श्‍वभूमीमधून आलेल्‍या या स्‍वावलंबी माणसाने यशाच्‍या व्‍याख्‍येला नव्‍या उंचीवर नेले आहे. मानवता व सहानुभूतीचे प्रतीक असलेल्‍या त्‍याच्‍याभोवती केंद्रित ही जाहिरात सामाजिक स्थितीकडे न पाहता सर्वांशी आदराने वागण्‍याच्‍या महत्त्वावर भर देते. ‘इन्‍सान छोटा या बडा अपनी सोच से होता है (व्‍यक्‍तीची विचारसरणी समाजातील त्‍याचे स्‍थान ठरवते), सक्‍सेस शुड नॉट गो टू युअर हेड’ या आपल्‍या संवादाच्‍या माध्‍यमातून शाहरूख खान प्रेक्षकांना इतरांच्‍या तुलनेत स्‍वत:च्‍या वृत्तीकडे पाहण्‍यास आणि समानता व दयाळूपणा अंगिकारण्‍यास प्रेरित करते. एकूण, ब्रँड जाहिरात यशस्‍वी व्‍यक्‍ती विनम्र राहत आपल्‍या उपलब्‍धींबाबत सांगतो, हे निदर्शनास आणते.

हॅमिल्‍टन सायन्‍सेस प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सौरभ गुप्‍ता म्‍हणाले की, फ्रॅग्रन्‍सच्‍या माध्‍यमातून जीवन संपन्‍न करण्‍याप्रती कटिबद्ध ब्रँड म्‍हणून आमचा मानवतेमध्‍ये सामावलेल्‍या यशाच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे. या मोहिमेसह आमचा संवादांना चालना देण्‍याचा प्रयत्न आहे. ते व्‍यक्‍तींना आठवण करून देतात की खरे यश दयाळूपणा व सहानुभूतीने वागण्‍यामध्‍ये आहे. यश व विनम्रतेचे प्रतीक शाहरूख खान आमचा ब्रँड संदेश देण्‍यासाठी अगदी योग्‍य आहे. आमच्‍या फ्रॅग्रन्‍सेसप्रमाणे यश फक्‍त दाखवण्‍यापुरते मर्यादित नाही. सर्वांशी आदराने वागण्‍यामधून मिळालेले यश महत्त्वाचे असते.

शाहरूख खान सात वर्षांपासून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून डिओडरण्‍ट ब्रँड डेन्‍वरशी संलग्‍न आहेत. वर्षानुवर्षे ब्रँड देशातील सर्वात पसंतीचा फ्रॅग्रन्‍स ठरला आहे. ब्रँडचा पुढील काही वर्षांमध्‍ये पुरूषांसाठी पसंतीचा ग्रूमिंग ब्रँड बनण्‍याचा मनसुबा आहे.  

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content