Homeबॅक पेज'दिल्ली' आणि 'शक्ती'...

‘दिल्ली’ आणि ‘शक्ती’ पोहोचल्या मलेशियाच्या कोटा किनाबालूला!

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल  राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा किनाबालू इथे पोहोचली आहेत.

मलेशिया नौदल (रॉयल मलेशियन नेव्ही) आणि मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांनी जहाजांचे स्वागत केले. या जहाजांच्या या बंदरातील मुक्कामादरम्यान, भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, तसेच विषय सामग्रीतज्ज्ञ योग, क्रीडा स्पर्धा आणि क्रॉस-डेक या एकमेकांच्या जहाजांना भेटी यासह विविध व्यावसायिक गाठीभेटींचे आदानप्रदान करतील. याचा उद्देश दोन नौदलांमध्ये असलेले विद्यमान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा आहे.

भारतीय नौदलाची जहाजे बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशिया नौदलाच्या जहाजांसह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्येही सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या मिलान आणि एक्स समुद्रा लक्ष्मणा, या दोन उपक्रमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे, दोन नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या भेटीमुळे दोन सागरी शेजारी देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणखी दृढ होईल.

या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची तैनाती, भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि भारत सरकारची सागर धोरणांप्रती दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. आय एन एस दिल्ली, ही पहिली स्वदेशी रचनेची आणि बांधणीची प्रोजेक्ट-15 श्रेणीतील गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजेच पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका आहे आणि आय एन एस शक्ती हे फ्लीट सपोर्ट म्हणजे ताफ्यातील पाठबळ पुरवणारे जहाज आहे. दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा म्हणजे पूर्व ताफ्याचा भाग आहेत.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content