Homeमाय व्हॉईस२२ जानेवारी "मर्यादा...

२२ जानेवारी “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा!

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होत असून तो दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

याबाबत हिंदू महासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांनी सांगितले की, हिंदू महासभेच्या वतीने, तत्कालीन फैजाबाद जिल्हाध्यक्ष स्व. ठाकुर गोपालसिंह विशारद यांनी रामलल्लाच्या दर्शन, पूजेचा अधिकार मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात (३/१९५०) वादपत्र प्रस्तुत करुन न्यायालयीन लढा सुरू केला होता. रामजन्मभूमीची विवादीत २.७७ एकर जमीन हिंदू महासभा, निर्मोही आखाडा आणि वक्फ बोर्डला समान विभागून देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दिनांक ३० सप्टेबर २०१०च्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रामलल्ला विराजमानच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे, हिंदू महासभेने लढलेल्या प्रदीर्घ लढ्याची इतिश्री झाली आहे.

या निर्णयामुळे विवादीत रामजन्मभूमी अखंड हिंदूकडे आली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेक्षणी शतकांपासूनचा संघर्ष समाप्त होऊन, समस्त हिंदूना रामलल्लाच्या दर्शनाचा, पुजेचा मुक्त अधिकार प्राप्त होणार आहे. त्यामुळेच हिंदू महासभेची धारणा आहे की, हा दिवस राष्ट्रीय दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि विलक्षण आहे. रामलल्ला हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. श्रीराम हिंदूचे उच्च श्रद्धेयस्थान आहे. समस्त हिंदू त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानतात. समस्त हिंदूच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारीचा राममंदिराच्या गर्भगृहातील, विलक्षण, अद्भुत, आनंदमयी, मंगलमय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा निरंतर अविस्मरणीय राहावा, यासाठी हा दिवस “मर्यादा पुरुषोत्तम दिन” म्हणून घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content