Wednesday, March 12, 2025
Homeबॅक पेजसर्वसामान्य ग्राहकांना मिळणार...

सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार 29 रूपयांनी तांदूळ

देशातल्या खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत ‘भारत आटा’ आणि ‘भारत चावल’ ब्रँड विक्रीसाठी केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) यांसारख्या निम-सरकारी आणि सहकारी संस्थांना केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गहू आणि तांदळचे अतिरिक्त वाटप केले आहे. 06.02.2024 पर्यंत, या संस्थांना 94,920 मेट्रिक टन गहू आणि 13,548 मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले असून त्यापैकी 54,343 मेट्रिक टन गहू आणि 200 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे. या संस्थांना गहू 1715 रुपये/क्विंटल आणि तांदूळ 18.59 रुपये/किलो दराने दिला जात आहे. या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5किलो/10 किलो पॅकेजमध्ये 27.50/किलो (आटा) आणि 29/किलो (तांदूळ) दराने विक्री करतील.

ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने  13.06.2023च्या पत्राद्वारे खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) च्या माध्यमातून वितरित करण्यासाठी  मान्यता दिली होती. 06.02.2024 पर्यंत, खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत)  द्वारे 10,22,907 मेट्रिक टन गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदळाच्या किमतींवरील महागाईवर   प्रतिबंधात्मक प्रभाव पडतो.

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते / गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड 300 (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार  अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली आहे.आजपर्यंत गव्हाचे 34 तर तांदळाचे 31 लिलाव झाले आहेत. या लिलावात 16,16,210 मेट्रिक टन गहू आणि 14,07,914 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला.

रास्त सामान्य गुणवत्तेच्या गव्हासाठी रुपये 2150/क्विंटल आणि शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत असलेल्या  गव्हासाठी रुपये 2125/क्विंटल आणि फोर्टिफाइड तांदळासाठी रुपये 2973/क्विंटल आणि एफएक्यू तांदूळासाठी रुपये 2900/क्विंटल राखीव किमतीवर गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 12,07,655 मेट्रिक टन गहू आणि 3877 मेट्रिक टन तांदूळ हे स्वीकारलेले प्रमाण आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव 28.06.2023पासून आणि नंतर दर बुधवारी सुरू झाला.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content