Homeमुंबई स्पेशलमुंबई विमानतळावर 17.18...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे.

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईत डीआरआय अधिकार्‍यांनी या महिला प्रवाशाला आगमन होताच अडवले. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता सामानात पांढरी पावडर असलेली 2 अन्न पाकिटे, पांढरी पावडर असलेला 1 प्लास्टिकचा कंटेनर आणि पांढऱ्या पावडरच्या गोळ्या असलेली 1 छोटी पिशवी आढळून आली. अधिकार्‍यांनी या प्रवाशाने गिळलेल्या दोन कॅप्सूलदेखील जप्त केल्या. एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून जप्त केलेल्या पदार्थांची चाचणी केली असता, ते कोकेन असल्याचे सिद्ध झाले. हा प्रतिबंधित माल मादक द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला असून, प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content