Monday, December 23, 2024
Homeटॉप स्टोरीवडेट्टीवार यांच्या घोषणेवर...

वडेट्टीवार यांच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांचा ‘उतारा’!

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा घटता आलेख लक्षात घेता शुक्रवारपासून सुरू होणारी अनलॉकची प्रक्रिया अखेर दोन दिवसांनंतर म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून लगेचच त्याचे खंडन करण्यात आले. काल मध्यरात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून १८ पानी आदेश जारी करून आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या घोषणेवर उतारा देण्यात आला.

यात वडेट्टीवार यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यांची वर्गवारी टाळत फक्त पाच टप्पे व त्याचा तपशील जाहीर केला. त्यामुळे कोणता जिल्हा कोणत्या टप्प्यात बसतो हे अस्पष्टच राहिले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा पुन्हा स्थानिक प्रशासनाकडे खिळल्या आहेत. तर प्रशासनातले अधिकारी या क्लिष्ट आदेशात, आपला परिसर नेमका कोणत्या टप्प्याच्या निकषांत बसतो हे तपासण्यात संपूर्ण दिवस घालवण्याची शक्यता आहे.

उद्यापासून १८ जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका पत्रकार परिषदेत केली. मात्र, वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर लगेचच मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनलॉकचा निर्णय झालेला नसल्याचे सांगत तसा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. एव्हढी मोठी घोषणा करण्याचे श्रेय कोण घेणार, यावर सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकमेकांवरील कुरघोडीचा परिणाम आणि समन्वयाचा अभाव यामुळे हे सारे घडले असल्याची कुजबूज नंतर सुरू होती.

उतारा

अशी आहे अनलॉकची प्रक्रिया

सध्याच्या आदेशानुसार कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची गरज यानुसार जिल्हे आणि महापालिका यांची ४३ विभागात विभागणी करण्यात आली आहे. पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये येथे अनलॉकची प्रक्रिया राबविली जाईल. दर आठवड्याला होणाऱ्या आढावा बैठकीत टप्प्यांचा पुनर्विचार केला जाईल व त्यानुसार त्यात आवश्यकतेनुसार बदल केले जातील.

या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. सध्या मुंबईचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे.

असे असतील पाच टप्पे

अनलॉकचे पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत.

पहिला टप्पा– पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक होईल. या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.

येथे सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होतील. मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरू होतील. जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील. सार्वजनिक वाहतूकसेवा पूर्ववत होईल. येथे जमावबंदी नसेल. खाजगी कार्यालये सुरू होतील, तर शासकीय कार्यलये पूर्ण क्षमतेने सुरू होतील. विविध खेळ, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधने नसतील. जमावबंदी नसेल.

दुसरा टप्पा– दुसऱ्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा २ जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

उतारा

येथे ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट, मॉल्स, जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर आणि सिनेमगृहे सुरू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. बांधकाम, कृषी, ई सेवा पूर्ण सुरू राहतील. बसेस पूर्ण बैठक क्षमतेने सुरू राहतील. जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन, बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे.

तिसरा टप्पा– तिसऱ्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील. मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत खुली राहतील. दुपारी २नंतर पार्सल सेवा सुरू राहील. शनिवार आणि रविवार हॉटेल्स बंद राहतील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू राहतील.

खाजगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती राहील. इनडोअर खेळ बंद राहतील. सिनेमा चित्रिकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार). लग्नसमारंभांना ५० जणांची तर अंत्यसंस्काराला २० जणांची उपस्थिती असेल. इतर बैठकांना ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील. कृषी, ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील. दुपारी २ वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहील.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1400911528010805252?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1400911528010805252%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fmaharashtra-government-announces-unlock-plan-here-is-the-detailed-notification-989485

चौथा टप्पा– चौथ्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पुर्ण वेळ बंद राहतील. सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील. हॉटेलमधील पार्सल सेवा फक्त सुरू राहील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू राहतील (सोमवार ते शुक्रवार).

अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त २५ टक्के उपस्थिती राहील. शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहील. आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नसेल. लग्नसोहळ्यासाठी २५ जणांची तर अंत्यसंस्कारसाठी २० लोकांची उपस्थिती असेल. राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के आसनक्षमतेने होतील.

ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे अशा ठिकाणांची बांधकामे सुरू राहतील. कृषी कामे दुपारी २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील. ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. सलून आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. पण, एसीचा वापर करता येणार नाही. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभे प्रवासी नसतील. संचारबंदीचे नियम लागू राहतील.

पाचवा गट – पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात रुग्णसंख्या या निकषांत वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये त्यांचा समावेश होईल.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content