Monday, December 23, 2024
Homeकल्चर +जगातल्या कोविडमागे चीनचाच...

जगातल्या कोविडमागे चीनचाच हात!

कोविडचा विषाणू हा चीननेच सोडला असून त्यामुळे साऱ्या जगात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे चीनवर कारवाई व्हायलाच पाहिजे. केवळ ढालीने किती दिवस लढणार, तलवारीचाही वापर करायलाच हवा. यासाठी सर्व बाधित देशांनी एकत्रित आले पाहिजे, भारतीयांनीही एकत्रित आले पाहिजे आणि त्यासाठी जनतेचा रेटा वाढवून चीनचा आर्थिक कणा मोडण्यासाठीही भारतीयांनी त्यांच्या वस्तू घेणे बंद केले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी केले.

मुंबईतल्या स्वा. सावरकर स्मारकाने शुक्रवारी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमालेत सातवे पुष्प गुंफताना ‘कोविड १९-एक खौफनाक खुलासा’ या विषयावर ते बोलत होते. कोविडचा विषाणू हा नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. चीनमधील वुहान येथील संस्थेत हे काम केले गेले. ती संस्था चीनच्या लष्कराशी संलग्न आाहे. चीननेच ही कोरोनाची महामारी छेडली असून ते काम २०१९मध्येच केले गेले आहे. यामुळे जगातील आर्थिक व्यवस्था कोलमडली आणि अनेक मृत्यू झाले, असे ते म्हणाले.

२०१७मध्येच जोडले गेले प्रकरण

यामधील काही तथ्ये सांगताना ते म्हणाले की, चीनी लष्कराच्या तत्त्वांबाबत असलेल्या एका पुस्तकात २०१७मध्ये एक नवीन प्रकरण जोडले गेले आहे. त्यात जैविक युद्ध संकल्पना समाविष्ट असून हा गंभीर विषय चीनमधील लष्करी तज्ज्ञांनी मांडला आहे. जैविक साधनांचा वापर कसा करता येतो, त्याने काय होते, काय घडू शकते आदी माहिती तपशीलवार त्यात दिली आहे.

१९९९ मध्येही दोन चिनी कर्नलनी अनियंत्रित युद्धपद्धती (अनरेस्ट्रिक्टेड वॉरफेअर) या संबंधातील एक पुस्तक लिहिले होते. त्यात अमेरिकेसारख्या महाशक्तीशी लढायचे झाल्यास कोणत्याही प्रकारची साधने चालतील, ती लष्करीच नव्हेत त बिगरलष्करीही असू शकतात. त्यात विजय मिळणे व मिळवणे महत्त्वाचे असते, असे या चिनी कर्नल्सनी सांगितले होते, अशी माहिती बक्षी यांनी दिली.

हिटलरनेही असा आततायीपणा केला नव्हता

हिटलरकडेही जैविक साधने होती. मात्र त्यानेही दुसऱ्या महायुद्धात त्याचा वापरही केला नव्हता. परंतु चीनच्या या कोरोना विषाणूमुळे जगातील विविध देशांमध्ये लोकांना प्राण गमवावे लागले. लोक कोरोनाग्रस्त झाले आणि उद्योगधंद्याचीही आणि आर्थिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली. वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेमध्ये प्रमुख असलेले दोन मेजर जनरल कुठे काम करीत, त्यांनी या विषाणू संबंधात काय काम केले आणि त्यांनी केलेल्या कामासंबंधात अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यात काय म्हटले होते हे बक्षी यांनी तपशीलात सांगितले.

हुकमारीची जोड अधिक घातक

त्यांच्या संशोधन अहवालानुसार कोरोनाच्या विषाणूसोबत हुकमारी क्यू हा विषाणू जोडला तर अधिक घातक विषाणू तयार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. हा अहवाल आता चीनने आंतरजालावरून नष्ट केला असल्याचेही सांगितले. अशा प्रकारच्या घटना या पुरावेच आहेत. हा कोरोनाचा विषाणू वुहानमधील मांस बाजारातून आला असल्याचे चीन सांगत असले तरी वटवाघळाची विक्री काही या वुहानमध्ये असलेल्या बाजारातून होत नाही. वुहानपासून ५०० किलोमीटर अंतरावरील एका गुहेत वटवाघळे होती आणि ती आणण्यासाठी वुहानमधील या संस्थेतील तज्ज्ञ गेले होते. त्यामधील एक डॉक्टर आजारी पडला, त्याला लष्करी रुग्णालयात दाखल केले होते, हे सर्व चीनच्या कारनाम्यांचे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला.

शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण गरजेचे

भारतात शाळांमध्ये लष्करी शिक्षण गरजेचे आहे. त्यासाठी माजी सैनिकही ते काम करण्यासाठी तयार असतील. यापूर्वी मात्र तसे प्रयत्नही केले गेले नाहीत. गांधीवादी विचारसरणी आणि आर्थिक दुर्बलतेमुळे ते शिक्षण सुरूही केले गेले नाही. एनसीसीचे कामही बंद केले गेले. आता तरी ते करायला काही हरकत नाही, असे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले.

लष्करी खर्च, आधुनिकीकरण, पॅलेस्टिनविरोधातील इस्रायलची कारवाई आदींबाबतही श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविक केले.

रविवारी अखेरचे पुष्प

या व्याखानमालेतले पुढील व्याख्यान रविवारी, दि. १६ मे २०२१ यादिवशी होणार असून त्यात नामवंत हिंदुत्ववादी अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ‘सावरकर की महत्तता’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी ७ वाजता हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानांचा आस्वाद घेण्यासाठी https://www.facebook.com/savarkarsmarak या लिंकवर जावे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content