Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत नाही!

नवी मुंबईमधील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी आरक्षित भूखंड सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावरून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका करत सरकारला घरचा अहेर दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत राहिलेली नाही, असं म्हणत आज अधिकारी बिल्डर्सचे दलाल झाले आहेत, असा खळबळजनक आरोप केला. त्यांच्या आरोपावर सभागृहात खळबळ माजलेली असतानाच नाईक यांनी सरकारला आव्हान देत असेही सांगितले की, सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत, असे मी म्हणत नाही. पण काही अधिकारी दलाल झाले आहेत आणि हे मी प्रूव्ह करू शकतो. हे मी गांभीर्याने सांगत आहे.

नाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरू होताना त्यांनी आपले म्हणणे मांडतामांडता हा गंभीर आरोप केला आणि सभागृहात खळबळ माजली. नवी मुंबई महापालिकेकडे भूखंड आरक्षित करण्याच्या संदर्भात अनेकदा बैठका, स्मरणपत्रे, न्यायालयाच्या तारखा असे सारे झाले. पण अधिकारी दाद देत नाहीत आणि काही अधिकारी तर बिल्डरांचे दलाल झाले आहेत, असा आरोप नाईक यांनी केला.

किंमत

वास्तविक, नाईक आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेन्द्र आव्हाड यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असूनही आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी या आरोपांनंतर सभागृहात गणेश नाईक यांची वाहव्वा केली. इतकेच नव्हे तर सत्ताधारी बाकांवर सर्वात पुढे शांतपणे हे सर्व ऐकत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बघत आव्हाड यांनी नाईक यांचे जाहीर कौतुक केले आणि ते म्हणाले, हे खरे दादा आहेत.

अजित पवार यांचा संभाषणांमध्ये, गप्पांमध्ये होणारा अजितदादा हा उल्लेख आणि अजित पवारांशी सध्या असलेले आव्हाड यांचे संबंध ही पार्श्वभूमी आव्हाड यांच्या टिप्पणीला होती. तरीही जितेन्द्र आव्हाड यांनी केलेली हे खरे दादा, या टिप्पणीनंतर सभागृहात विरोधी पक्षातीलदेखील मोजक्याच आमदारांनी त्यांना दाद दिली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content