Homeहेल्थ इज वेल्थमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सेवेद्वारे दररोज दीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीने व फिजिओथेरपीच्या माध्यमातून विश्रांती आणि आराम दिला जात आहे. सूजलेले पाय, बोटांतील जळजळ, तळपायातील वेदना यावर तत्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य पथक सज्ज आहे. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहितीही दिली जात आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे हाती घेण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण ४३ ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही या सेवेत सक्रिय सहभाग असणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी कक्षाच्या पुढाकारातून ‘चरणसेवा’ दिली जात आहे. गरजेनुसार वारकऱ्यांना आरोग्यविषयक इतर सुविधाही पुरविण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहितीही वारकऱ्यांना दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबईचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content