Homeकल्चर +गोरेगावच्या चित्रनगरीत रंगला...

गोरेगावच्या चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविद्येच्या जागृतीसाठी आज मुंबईतल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष योग उपक्रमात मराठी चित्रपट व मालिकांमधील लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. त्यात सुशांत शेलार, मेघा धाडे, अभिजीत केळकर, अविनाश नारकर, नंदिनी वैद्य, नियती राजवाडे, सुमिरन मोडक, भार्गवी चिरमुले, अनघा भगरे, मिलिंद गवळी, तीतिक्षा तावडे, शर्वानी पिल्ले, रोहिणी निनावे, गीतांजली ठाकरे, कल्पना जगताप, मानसी इंगळे यांचा समावेश होता.

यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग सत्राने झाली. या सत्रात उपस्थितांनी योगासने करत, आरोग्य, मानसिक शांतता आणि जीवनशैलीमध्ये समतोल साधण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी आशिष शेलार म्हणाले की, “योग हा भारताच्या ऋषी परंपरेचा वारसा आहे. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण योगाद्वारे निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे. कलाकार समाजाचे आरसाच आहेत. त्यांनी योगप्रसाराचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा आहे.” चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की, “योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. धकाधकीच्या जीवनात हरवलेलं मानसिक संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे.”

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content