स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्या...
मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले...
प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे...
वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली...
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती! यानिमित्त आम्ही डॉ. आंबेडकर यांनी तेव्हाही कशी पर्यावरणाची काळजी होती हे दाखवणारे एक दुर्मिळ...
‘महाशिवरात्री’निमित्त येत्या बुधवारी, २६ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नित्यनेमाने दर बुधवारी बंद राहणारे मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीची राणीची...
मुंबई महानगरपालिका, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ५ व ६ यांच्या विद्यमाने नागरिकांसाठी आज, १५ आणि उद्या १६ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व येथील...
मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता दुभाजकाचे संकल्पना आधारित (थीम बेस्ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्वनीप्रदूषणास प्रतिबंध...