बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय...
मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ ३२वी जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा एम. सी. ए. ट्रेनिंग...
मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या...
संपूर्ण विश्वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान...
मुंबई शहर कबड्डी असो.चे माजी खजिनदार व ताडदेवच्या आर्य सेवा मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर शिरवाडकर यांचे आज, २० जुलै रोजी पहाटे झोपेतच प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले....
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील...
मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात...
मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्त्वाखालील विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री...
मुंबईतल्या कुर्ला स्थानक येथे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका श्वानाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात संबंधितांना यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका,...
भारतीय टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला दुपारी 3 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची...