महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघातल्या मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर निवडणूक शाखेने दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार आज बुधवारी, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांना मतदारयादीसंदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी 022-20822693 हा हेल्पलाइन क्रमांक तसेच https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे मुंबई शहर जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.