Homeबॅक पेजदारू पिऊन धिंगाणा...

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नाशिकच्या गंगापूर रोडवर काल मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक, युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडीओमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. त्यांच्याजागी जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ एक क्लबमधून नाईट पार्टी करून दारूच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्तीपथक दाखल झाले. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली. मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर साळवे (30) रा. पवन नगर, सिडको, वैशाली वाघमारे, नाशिकरोड, भूमी ठाकूर (19) भाभा नगर, आलटमश शेख, वडाळा गाव, दोन बाऊन्सर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content