Homeपब्लिक फिगरमुंबईच्या समुद्रात लवकरच...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची तसेच सी ८ आणि पी १२, या बोटींची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला कंपनीच्या सी ८ आणि पी १२ या अत्याधुनिक बोटींची सफर केली. या बोटी पाण्यावर ग्लाईड होणाऱ्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत.

कॅन्डेला

कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हॅसेल्सकॉग तसेच मुख्य वाणिज्य अधिकारी नकुल विराट यांनी राणे यांना कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेची आणि तांत्रिक नवकल्पनांची सविस्तर माहिती दिली. यादरम्यान महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल.

मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारी भागांतील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतुकीसह किनारी विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, तसेच रोजगारनिर्मितीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content