ज्यांच्याकडे संगणक आहे त्यांना चॅटजीपीटीची ओळख नसेल अशी शक्यता फार कमी आहे. कधी न कधी तरी त्यांनी चॅटजीपीटी पाहिला असेलच. काहींनी या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे काही विचारणा केली असेल किंवा इतरांनी तिच्याकडून काही भाषांतर अथवा अमुक एका विषयावर निबंध किंवा कविता लिहून घेतली असेल आणि या नव्या तंत्रज्ञानाला सलाम केला असेल. याच लोकांपैकी काही अधिक उत्साही लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आवाजाचा उपयोग करून घेतला असू शकेल. ‘अलेक्सा’चा परिचयही तुम्हाला असेल…
तसे बघायला गेलो तर ‘अलेक्सा’ आपल्या बहुतेकांच्या ओळखीची झाली आहे आणि जीपीएसवर आपल्याला रस्त्यांचे आणि आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचे मार्गदर्शन एक आवाजच करतो आणि जगातल्या लाखो लोकांना त्यांचे त्यांचे वेगेवेगळे मार्ग एकाचवेळी सांगणारा आवाज समान असतो. म्हणजेच हा आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेतून निर्माण केला जातो. हे सगळे सांगण्याचे कारण असे की जे आवाज उपयोगात आणले जातात त्यांच्या मूळ आवाजाचा धनी जो कुणी असेल त्याची परवानगी घेतली असणारच. त्याशिवाय आवाज उपयोगात आणता येणार नाही.

गेल्या आठवड्यात याबद्दलचा अहवाल आला आहे त्यात जोखमीच्या अशा काही बाबींची माहिती दिली आहे. यात असे म्हटले गेले आहे की, जे उपयोगकर्ता चॅटजीपीटीशी प्रगत पातळीवरील स्वरसंवाद साधतात त्यांचा आवाज चॅटजीपीटीकडून नोंदवून घेतला जातो आणि त्या आवाजात चॅटजीपीटी उपयोगकर्त्याशी बोलते. ही बाब ‘अर्स टेक्निका’च्या अहवालात आली आहे. असा आवाज साहजिकच विनापरवानगी असतो आणि अशा प्रकारावर मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि या प्रश्नाचा सामना करण्यासाठी आणखी काय करता येईल याची तपासणी सुरु आहे.
अशा आवाजाची निर्मिती ही विरोध नसतानाच्या परिस्थितीत प्रगत चॅटजीपीटीकडून होऊ शकते. परंतु हे अनवधानाने झाले आहे असे चॅटजीपीटीचे म्हणणे आहे. ओपन एआय यांनी त्यांच्या यंत्रणेत ‘कृत्रिमरीत्या तयार केलेल्या मानवी आवाजाची’ सोय आहे. यामधून चुकीची माहिती पसरवण्यासाठी असे काही प्रकार घडू शकतात असे कंपनीने म्हटले आहे. काही उपयोगकर्त्यांच्या या विषयातील प्रतिक्रिया गमतीच्या आहेत. एक म्हणाले की, कृत्रिम आवाजाला गाणे म्हणायला शिकवले असते तर मी काही कृत्रिम बुद्धिमेत्तेने रचलेली गाणी ऐकू शकलो असतो. एरवी कविता तर ती करतेच आहे… मग गाणेही म्हणू शकेल… ‘अलेक्सा’ला गाणे गाता येते का हे मला माहित नाही. तुम्हाला?