इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC)चे अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांना ब्रिटिश संसदेतर्फे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
अर्पित काबरा मूळचे राजस्थानच्या अजमेरचे. सध्या ते मुंबईत राहतात. फॉरेन्सिक ऑडिटिंगद्वारे त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रदान करण्यात आला. तरुण वयात, अर्पित
काबरा यांनी ICAIच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले. महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न तसेच WIRCमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे ते या सन्मानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, WIRCच्या टीमने मुंबईत सर्वात मोठ्या मानवी मोझॅकचा विश्वविक्रमही केला होता.
त्याच्या या कामगिरीने सीएंच्या जगतात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. अर्पित काबरा यांच्या अनुकरणीय कार्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा बेंचमार्क प्रस्थापित झाला आहे, ज्याने सामान्य नागरिकांपासून व्यावसायिक वर्तुळांपर्यंतच्या लोकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमवर प्रभाव टाकला आहे. अर्पित काबरा यांनी त्यांचे हे यश आपल्या कुटुंबाला तसेच WIRCमधील टीमला समर्पित केले आहे.