Friday, September 20, 2024
Homeचिट चॅटसंगीतासाठी ‘आता विकत...

संगीतासाठी ‘आता विकत घ्या, नंतर पैसे द्या’!

स्मार्टफोन खरेदीसाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व लोकप्रिय झालेल्या “बाय नाऊ पे लेटर” (बीएनपीएल) या ट्रेंडने ‘ईएमआय’ अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. संगीतातील एखादे वाद्य असो, स्वयंपाकघरातील एखादे उपकरण असो वा अगदी केसांवर उपचार करून घेणे असो, सर्वत्र ईएमआय पद्धतीने पेमेंट करणे रूढ झाले आहे. विशेषतः, ‘घरातच राहा, घरातूनच काम करा’, या सध्याच्या वातावरणात ही पद्धत अधिकच उपयोगात येऊ लागली आहे.

एका पाहणीनुसार, गिटार व पियानो यांसारख्या वाद्यांच्या किंमती 40 हजारांच्या घरात असल्याने, महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसरख्या शहरांत “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” या पद्धतीने, ‘एमस्वाईप’च्या ‘पीओएस टर्मिनल्स’वरील ‘इन्स्टंट चेकआऊट फायनान्स’ पर्यायातून खरेदी केली जात आहे.

एसएमई क्षेत्रासाठीची भारतातील आघाडीची ‘एंड-टू-एंड डिजिटल एनेबलर’ आणि देशातील सर्वात मोठी ‘पीओएस अॅक्वायरर’ असलेल्या ‘एमस्वाईप इंडिया’ या कंपनीने, व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये झालेल्या “बाय नाऊ पे लेटर” या व्यवहारांचे विश्लेषण करून काढलेला हा निष्कर्ष आहे. मोबाईल, ग्राहकोपयोगी वस्तू, शिक्षण, आरोग्य, फर्निचर, स्वास्थ्य आणि लक्झरी या विभागांमधील लघु व मध्यम उद्योगांना आपल्या ‘ब्रँड ईएमआय’च्या माध्यमातून बीएनपीएल किंवा ‘चेकआउट फायनान्स’ची ऑफर ‘एमस्वाईप’तर्फे देण्यात येते.

केस गळणे, विरळ होणे यावरील उपचार करताना ‘बीएनपीएल’द्वारे पेमेंट करण्यात येते, असे दिसून आले आहे. या पेमेंटचा हा आणखी एक वर्ग निर्माण झाला आहे. मुंबईखेरीज दिल्ली व बेंगळुरू येथे ‘एमस्वाईप’चे व्यापारी हे व्यवहार मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ‘कोविड-19’मुळे शहरांमध्ये चिंता वाढल्याचे हे लक्षण आहे. केस गळणे व विरळ होणे यावरील उपचारांकरीता सरासरी 43 हजार रुपयांचा खर्च येतो. महानगरांमध्ये लोकांच्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत, हेही यातून दिसून येते.

‘एमस्वाईप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष पटेल म्हणाले की, “या पाहणीच्या निष्कर्षांतून ग्राहकांच्या जीवनशैलीतील निवडी आणि त्यांच्या वित्तनियोजनाचे प्राधान्य या दृष्टीने त्यांच्या वर्तणुकीत होत असलेले मूलभूत बदल दिसून येतात. ग्राहकांना आतापर्यंत ‘चेकआऊट फायनान्स’च्या वापरातून प्रोत्साहन न देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना, ईएमआय अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रमाणामुळे आता अनोख्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘एमस्वाईप’च्या ‘ब्रॅंड ईएमआय’मुळे किरकोळ विक्रेत्यांना पेमेंटच्या अटी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना देता येते आणि त्याद्वारे या ग्राहकांना खरेदीचा एक संपन्न अनुभव मिळतो.”

देशाच्या पश्चिमेकडील भागांत बीएनपीएल ही सुविधा संगीत वाद्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात असताना, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम या उत्तर व पूर्व पट्ट्यांतील राज्यांमध्ये, स्वयंपाकघरातील चिमणी, कुकटॉप्स, हॉब्स, बिल्ट-इन-ओव्हन, कुकिंग रेंज आदी उपकरणांची खरेदी करण्यासाठी ग्राहक ‘बीएनपीएल’चा वापर करताना आढळले आहेत. ‘बीएनपीएल’द्वारे खरेदी करणाऱ्या या ग्राहकांचे व्यवहार साधारणपणे 20 हजार रुपयांच्या आसपास असतात. 

‘बीएनपीएल’च्या माध्यमातून स्वयंपाकघरासाठी होणाऱ्या या अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीचे प्रमाण पंजाबमधील लुधियाना, चंडीगढ, जालंधर, तसेच उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी, गुडगाव, हरयाणातील फरीदाबाद, दिल्ली, पूर्व भारतातील गुवाहाटी व कोलकाता येथे बऱ्यापैकी आढळले. घरातून काम करण्याच्या सध्याच्या व्यवस्थेत, स्वयंपाकघरात यंत्रे व उपकरणे वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दक्षिणेकडील चेन्नई व कोयंबतूर, पश्चिमेकडील अहमदाबाद, सूरत, वडोदरा या शहरांमध्येही हा कल पाहण्यात आला. 

लोक घरातूनच काम करत असताना, त्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सवय लागलेली असताना, देशाच्या दक्षिणेकडील भागातील, विशेषत: तमिळनाडूतील चेन्नई, कोयंबतूर व इरोड, तसेच केरळमधील त्रिवेंद्रम, एर्नाकुलम, अंगमाली, कालिकत व कन्नूर या शहरांमध्ये, ऑफिसला जाणारे नोकरदार औपचारिक आणि प्रासंगिक शर्ट व धोती यांच्या खरेदीसाठी बीएनपीएल वापरत आहेत. 

‘एमस्वाईप’ने गेल्या वर्षअखेरीस मूल्यवर्धित सेवा म्हणून ‘ब्रॅण्ड ईएमआय’ची सुरूवात केली. या सुविधेमुळे, व्यापारी त्यांच्याकडील 30पेक्षा जास्त ब्रॅंड्सवर, 15 सेकंदांपेक्षा कमी वेळात, शून्य टक्के व्याजदरावर, ईएमआय वित्तपुरवठा करू शकतात. यातून ‘चेकआउट’ प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होते आणि योग्य वित्तपुरवठ्याचा पर्याय नसल्यामुळे ‘कार्ट’ सोडून जाण्याचे ग्राहकांचे प्रमाण कमी होते. त्यायोगे लहान व्यवसायांना विक्री वाढण्यास मदत होते.

एसएमई आणि व्यापाऱ्यांना मोबाइल पीओएस आणि मूल्यवर्धित सेवा अखंडितपणे पुरवून देशातील सर्वात मोठा आर्थिकसेवा प्लॅटफॉर्म बनण्याचे ‘एमस्वाईप’चे लक्ष्य आहे. देशभरातील 6.75 लाख पीओएस आणि 11 लाख क्यूआर मर्चंट यांचे नेटवर्क असणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी स्वतंत्र मोबाईल ‘पीओएस मर्चंट अक्वायरर’ आहे. कार्ड्स, वॉलेट्स, मोबाइल पेमेंट अ‍ॅप्स आणि बँक अ‍ॅप्स, तसेच  कॉन्टॅक्टलेस व क्यूआर पेमेंट्स या पेमेंट करण्याच्या विविध प्रकारांसाठी ‘एमस्वाईप’ कंपनी सोल्युशन्स देते. मुंबईत मुख्यालय असलेल्या ‘एमस्वाईप’ने 2011 मध्ये कामकाज सुरू केले. या कंपनीच्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये बी कॅपिटल, यूसी-आरएनटी, फाल्कन एज कॅपिटल, मॅट्रिक्स कॅपिटल पार्टनर्स, डीएसजी पार्टनर्स आणि एपिक कॅपिटल यांचा समावेश आहे.

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content