प्रिय वाचक,
किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.

किरण हेगडे, संपादक

प्रिय वाचक,

किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. किरण हेगडे, संपादक

Homeकल्चर +ब्रिटन रेल्वे आणि...

ब्रिटन रेल्वे आणि यशराज फिल्म्स एकत्र साजरा करणार प्रेमाच्या उत्सव!

२०२५मध्ये आधुनिक रेल्वेच्या २००व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स एकत्र येत आहेत. रेल्वे 200, या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला जात आहे. योगायोग असा की, २०२५मध्ये यशराजच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे याच्या ३०व्या वर्षाचा मोठ्या दिमाखात उत्सव साजरा केला जाणार आहे. हा चित्रपट भारत, भारतीय आणि संपूर्ण दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी एक पॉप कल्चर माईलस्टोन आहे. या चित्रपटाच्या अनेक दृश्यांचे चित्रिकरण ब्रिटनमध्ये झाले होते, ज्यामध्ये किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवरील आयकॉनिक सीनदेखील समाविष्ट आहे. याच ठिकाणी शाहरुख खान आणि काजोल यांचे पात्र प्रथम भेटतात आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होते.

ब्रिटनची रेल्वे आणि यशराज यांनी रेल्वे प्रवासातील रोमान्सला समर्पित करत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्या सांस्कृतिक सहकार्याची घोषणा केली आहे. सध्या यशराज, कम फॉल इन लव – द डीडीएलजे म्यूजिकल, या दिलवाले..च्या म्युझिकल अ‍ॅडॅप्टेशनची सहनिर्मिती करत आहे. या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे २०२५ रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये होणार आहे आणि तो २१ जून २०२५पर्यंत चालणार आहे. यासाठी मँचेस्टर आणि लंडनच्या प्रमुख रेल्वेस्टेशनवर खास इमर्सिव्ह अ‍ॅक्टिव्हेशन्स आयोजित केले जातील. कम फॉल इन लव – द डीडीएलजे म्यूजिकल या इंग्रजी संगीत नाटकाचे दिग्दर्शन दिलवाले..चे मूळ दिग्दर्शक आदित्य चोप्रा करत आहेत.

ही कथा एका ब्रिटिश भारतीय मुलीची आहे, जिला तिच्या कुटुंबाने भारतातील एका मित्रासोबत लग्न करण्यास सांगितले आहे. मात्र, परिस्थिती तेव्हा बदलते जेव्हा ती रॉजर नावाच्या एका ब्रिटिश तरुणाच्या प्रेमात पडते. या भव्य निर्मितीमध्ये एकूण १८ नवीन इंग्रजी गाण्यांचा समावेश आहे. संगीतातील पूर्व-पश्चिम संगम दिसून येतो, कारण संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे, तर गीतलेखन आणि कथा नेल बेंजामिन (मीन गर्ल्स, लीगली ब्लॉन्ड) यांनी लिहिली आहे. क्रिएटिव्ह टीममध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आहेत. नृत्यदिग्दर्शक रॉब अशफोर्ड (डिज्नीचा फ्रोजन), भारतीय नृत्यांसाठी सहनृत्यदिग्दर्शक श्रुती मर्चंट (ताज एक्सप्रेस), सेट डिझायनर डेरेक मॅकलेन (मौलिन रूज! द म्यूजिकल) आणि कास्टिंग डिरेक्टर डेव्हिड ग्रिनड्रॉड यांचा समावेश आहे.

दिलवाले.. हा भारतीय सिनेमाचा सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे आणि तो १९९५पासून आजतागायत मुंबईत सलग प्रदर्शित होत आहे. रेल्वे २००च्या कार्यकारी संचालिका सुझान डोनेली म्हणतात की, आम्ही यशराज फिल्म्ससोबत भागीदारी करत आहोत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. रेल्वेने नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा दिली आहे आणि जगभरातील संस्कृती जोडण्याचे काम केले आहे. यंदाच्या द्विशतक महोत्सवाच्या निमित्ताने, या आयकॉनिक रेल्वेआधारित बॉलिवूड ब्लॉकबस्टरच्या ३०व्या वर्धापनदिनाचा आणि याच्या नवीन इंग्रजी म्युझिकलच्या युके प्रीमियरचा एकत्रित उत्सव साजरा करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

यशराज फिल्म्सचे सीइओ अक्षय विधानी म्हणाले की, रेल्वेच्या २००व्या वर्धापनदिनाच्यानिमित्ताने ब्रिटनच्या रेल्वेसोबत सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही नेहमीच भारतीय मुळं जपत जागतिक पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगण्यावर भर दिला आहे आणि दिलवाले.. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दिलवाले..च्या ३०व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही या आयकॉनिक चित्रपटाच्या स्टेज अडॅप्टेशनला युकेमध्ये आणत आहोत! दिलवाले..चा सर्वात आयकॉनिक सीन किंग्स क्रॉस रेल्वेस्टेशनवर शूट करण्यात आला होता आणि तो कम फॉल इन लव मध्येदेखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे 200सोबत भागीदारी करण्यासाठी हा एक परिपूर्ण क्षण आहे. २०२५मध्ये दिलवाले..ची जादू पुन्हा एकदा परदेशी प्रेक्षकांसाठी खुलणार आहे आणि या सांस्कृतिक सहकार्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रेम आणि कलेचा एक नवा सोहळा रंगणार आहे!

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content