Homeकल्चर +महिला ऊसतोड कामगारांवरील...

महिला ऊसतोड कामगारांवरील ‘बीटरस्वीट’ ‘कान्स’मध्ये!

महिला ऊस कामगारांच्या भावनिक कोंडीचं नाट्य दर्शविणाऱ्या ‘बिटरस्वीट’, या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. या चित्रपटाची ‘कान्स’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक संचालनालयाने यंदाही दरवर्षीप्रमाणे कान्स येथील मार्श डू फिल्म सेक्शनसाठी एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाची निवड केली आहे. यासाठी ‘बीटरस्वीट’ या चित्रपटाची निवड झाली असून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकार आणि सांस्कृतिक विभागातील संबधित अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयात नुकतीच चर्चा केली. या चित्रपटात महाराष्ट्रातील महिला ऊस कामगारांच्या भावनिक कोंडीचं नाट्य दाखवलं आहे. ‘बिटरस्वीट’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला होता. स्क्रीन इंटरनॅशनलमध्ये या चित्रपटाची वाहव्वा झाली असून त्यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अक्षया गुरवच्या कामाचं कौतुक करण्यात आले.

एका वृत्तपत्रात अनंत महादेवन यांनी ‘बीड: अ व्हिलेज ऑफ वूमन विदाऊट वॉम्ब्स’ हा मथळा वाचला होता. हे वाचून ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी चित्रपटाचं चित्रिकरण विषयाशी संबंधित असलेल्या गावात जाऊन करायचं ठरवलं. यात त्यांनी बीड येथील ऊस कामगारांबरोबर चर्चा केली. नंतर त्यांनी सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, गुरू ठाकूर, भाग्यश्री पाने, अनिल नगरकर, अक्षया गौरव, विवेक चाबुकस्वार, सुरेश पटनाईक, असित रेडिज या अनुभवी आणि ताकदीच्या कलाकारांची निवड केली. नंदू आचरेकर याचे असोसिएट डायरेक्टर आणि रिसर्च हेड आहेत तर संवाद महेंद्र पाटील यांचे आहेत. सिनेमेटोग्राफर म्हणून अल्फान्स रॉय यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली आहे.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि हेनन आयर्लंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या या स्फोटक सामाजिक विषयावरील संवेदनशील चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झाले. निर्माते सुचंदा चटर्जी आणि शुभा शेट्टी यांचा ‘बिटरस्वीट’ हा पहिला चित्रपट आहे. निर्मात्यांच्या पदार्पणातील चित्रपटालाच बरेच नावाजले गेले आहे.

कान्स येशील मार्श दू फिल्म सेक्शनसाठी सलग दुसऱ्यांदा अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची निवड झाली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या ‘माई घाट’ या चित्रपटाची निवड झाली होती. महाराष्ट्र सरकारनं मार्श दू फिल्म सेक्शनसाठी ‘बिटरस्वीट’ची केलेली निवड खूप महत्त्वाची आहे, कारण ही निवड अनुभवी आणि ज्येष्ठ परीक्षकांनी केली आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content