Monday, December 23, 2024
Homeकल्चर +पं. भीमसेन जोशी...

पं. भीमसेन जोशी यांचा चरित्रपट पाहा आज दिवसभर!

हिंदुस्थानी संगीताचे पितामह, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (1922-2011),  यांचे जन्मशताब्दी वर्ष 4 फेब्रुवारी 2021 ते 2022 या कालावधीत साजरा होत आहे. त्यांना अभिवादन म्हणून केंद्र सरकार ते विविध कार्यक्रमांद्वारे साजरे करणार आहे. या जन्मशताब्दी वर्ष सोहोळ्याचा आरंभ या महान गायकावर फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेल्या, नामांकित कवी व चित्रपटकार गुलजार दिग्दर्शित फिल्मच्या प्रसारणाने होईल. फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ व यु-ट्युब वाहिनीवरून या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल. पुढील वर्षात  दूरदर्शन तसेच भारताबाहेरील कार्यक्रमांशिवाय फिल्म्स डिव्हिजनची क्षेत्रीय कार्यालये, गैरसरकारी संस्था व सांस्कृतिक संस्था यांच्या सहकार्याने देशभर या चित्रपटाचे प्रसारण होईल.

पंडित भीमसेन जोशी (73Min./Hindi/1992) या किराणा घराण्याच्या अलौकिक गायकाचे  जीवन व त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला आत्मीय ख्यालगायन, भजन व अभंग तसेच आपल्या अजोड आवाजाने दिलेल्या योगदानाचा आलेख आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी अनेक चित्रपटांसाठीही गायन केले आहे. अनकही (1985) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उठवली होती. या माहितीपटाचे आज म्हणजेच 4 फेब्रुवारी 2021ला https://filmsdivision.org/वर Documentary of the Week म्हणून तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivisionवर 24 तास प्रसारण होईल.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content