Homeमुंबई स्पेशलऔचित्त्याची ऐशीतैशी...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते. पण, राज्याच्या विविध भागातील आमदार विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील विषय औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत असताना त्याचे पुढे काय होणार, याबद्दल शंकाही व्यक्त करत होते. त्यामुळेच सदस्य औचित्त्याचे मुद्दे उपस्थित करताना ना सरकार विधानसभेत त्यावर काही उत्तर देते ना संबंधित विभाग आमदारांच्या या मुद्द्यांची दखल घेताना दिसतात, अशी खंत आमदार कृष्णा खोपडे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

आमदार औचित्त्याचा मुद्दा उपस्थित करतात, पण सरकारी विभाग मात्र विधानसभेत हे मुद्दे उपस्थित केल्यानंतरही नऊ- नऊ महिने त्याची दखलही घेत नाहीत, अशी तक्रार नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मांडली. गेल्या वर्षी विधानसभेत औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केलेल्या विषयांवर एक वर्षानंतरही कार्यवाही झालेली नाही, याकडेही खोपडे यांनी लक्ष वेधले. त्यावर विधानसभेचे पीठासीन अधिकारी, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांनी एक महिन्यात औचित्त्याच्या मुद्द्यांवर आमदारांना उत्तरे पाठवावीत, असे निर्देश दिले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...
Skip to content