Homeमुंबई स्पेशल‘माझी मुंबई’वरील खुली...

‘माझी मुंबई’वरील खुली बालचित्रकला स्पर्धा येत्या रविवारी!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कलाविषयक विविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमांच्या शृंखलेत जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी करण्यात येते. यानुसार यंदादेखील पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा येत्या रविवारी म्हणजेच ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेली २ वर्षे कोविड साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा प्रत्यक्ष स्वरुपात मुंबईतल्या विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे चितारणाऱ्या स्पर्धकांसाठी रुपये ५००/- ते रुपये २५ हजारांपर्यंतची तब्बल ५५२ पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रदेखील देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे उपायुक्त केशव उबाळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील ‘माझी मुंबई’ या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या लोकप्रिय स्पर्धेचे हे १४वे वर्ष असून यावर्षीदेखील ही स्पर्धा एकूण ४ गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये “मी आणि माझा फॅन्सी ड्रेस, मी आणि माझी आई, मी व फुलपाखरू” असे ३ विषय आहेत.

इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २करिता ३ विषय निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये “माझ्या बाहुलीचे लग्न, मी मेकअप करतो / करते, मी व माझा आवडता प्राणी” असे ३ विषय आहेत. इयत्ता सहावी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ३करिता ३ विषय निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये “आम्ही व्यायाम करतो / करते, आम्ही वर्ग / शाळा सजावट करतो, आम्ही बागेत खेळतो” असे ३ विषय आहेत, असे त्यांनी सांगितले.

इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४करिता ३ विषय निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये “माझ्या स्वप्नातील मुंबई, देशाच्या प्रगतीत महिलांचे मोलाचे योगदान व सांघिक खेळातील जिंकण्याची जिद्द” असे ३ विषय आहेत. या चारही गटातील स्पर्धकांसाठी एकूण ५५२ रोख पारितोषिके असणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक गटात रुपये २५ हजारांचे प्रथम पारितोषिक, रुपये २० हजारांचे द्वितीय पारितोषिक, रुपये १५ हजारांचे तृतीय पारितोषिक आणि रुपये ५ हजारांची १० पारितोषिके असणार आहेत. याव्यतिरिक्त पालिकेच्या प्रत्येक विभाग स्तरावर उत्तम चित्रांसाठी रुपये ५००/- इतक्या रकमेची पाचशे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व भाषिक पालिका शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विना-अनुदानित प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी त्यांच्या शाळांनी ७७७७-०२५-५७५ या क्रमांकावर किंवा www.balchitrakala.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि त्यांच्या शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.

गेली २ वर्षे ऑनलाईन पद्धतीने आयोजित होणारी ही स्पर्धा यंदा पालिका क्षेत्रातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. या ४५ ठिकाणांचे विभागनिहाय संक्षिप्त पत्ते पुढीलप्रमाणे-

‘ए’ विभाग– कुपरेज बॅण्डस्टॅण्ड मैदान, ओव्हल मैदानाजवळ

‘बी’ विभाग– सीताराम शेणॉय उद्यान, नवरोजी हिल रोड क्र. ७, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वेस्टेशनजवळ

‘सी’ विभाग– स. का. पाटील उद्यान, चर्नीरोड स्टेशन जवळ, महर्षि कर्वे मार्ग

‘डी’ विभाग– ऑगस्ट क्रांती मैदान, ऑगस्ट क्रांती मार्ग

‘ई’ विभाग– वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा (पूर्व)

‘एफ दक्षिण’ विभाग– कामगार मैदान, के. ई. एम. रुग्णालयाजवळ, परळ

‘एफ उत्तर’ विभाग– न्यू सायन महानगरपालिका शाळा मैदान, शीव

के. डी. गायकवाड महानगरपालिका शाळेचे मैदान

कोरबा मिठागर महानगरपालिका शाळेचे मैदान

‘जी दक्षिण’ विभाग– हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोरजंन मैदान

सुनिता दत्‍ताजी नलावडे मनोरंजन उद्यान, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल

आदर्श मैदान, कोळीवाडा, वरळी

‘जी उत्तर’ विभाग– संत ज्ञानेश्‍वर उद्यान, चैत्‍यभूमीजवळ, दादर (पश्चिम)

‘एच पूर्व’ विभाग– एम. आय. जी. क्रिकेट क्लब, वांद्रे (पूर्व)

‘एच पश्चिम’ विभाग– कमला रहेजा उद्यान (राजेश खन्ना उद्यान), रोटरी, गजधर पार्कजवळ

‘के पूर्व’ विभाग – छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व)

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्‍पग्राम, पूनम नगर, जोगेश्‍वरी (पूर्व)

‘के पश्चिम’ विभाग– कमलाकर पंत वालावलकर उद्यान, ओशिवरा

‘पी दक्षिण’ विभाग– प्रबोधनकार ठाकरे मैदान, गोरेगाव (पश्चिम)

आरे कॉलनी महानगरपालिका शाळा मैदान, गोरेगाव (पूर्व)

‘पी उत्तर’ विभाग– शीला रहेजा उद्यान, खडकपाडा, अरुण कुमार वैद्य मार्ग, दिंडोशी, मालाड (पूर्व)

स्वामी विवेकानंद क्रीडांगण, नवजीवन शाळेजवळ, राणीसती मार्ग, मालाड (पूर्व)

प्रि‍यदर्शिनी इंदिरा गांधी उद्यान, पारेखनगर, मालाड (पूर्व) 

चाचा नेहरू क्रीडांगण, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम)

अण्णा सावंत मनोरंजन उद्यान, मार्वे रोड, मालाड (पश्चिम)

‘आर दक्षिण’ विभाग– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समता नगर

बजाज रोड महानगरपालिका शाळा मैदान, कांदिवली (पश्चिम)

चारकोप महानगरपालिका शाळा मैदान, सेक्टर – १, चारकोप

‘आर मध्य’ विभाग– वीर सावरकर उद्यान, बोरिवली (पश्चिम)

‘आर उत्तर’ विभाग– आजी–आजोबा उद्यान दहि‍सर (पूर्व)

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान (भावदेवी मैदान), दहिसर (पश्‍चिम)

‘एल’ विभाग– गंगाराम साटम उद्यान, काजूपाडा महानगरपालिका शाळेजवळ, कुर्ला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान, शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व)

‘एम पूर्व’ विभाग– छत्रपती शाहूजी महाराज उद्यान, शिवाजी नगर महानगरपालिका शाळेजवळ

स्व. अमरनाथ पाटील मनोरंजन क्रीडा संकुल, गोवंडी

‘एम पश्चिम’ विभाग– टिळकनगर महानगरपालिका शाळेचे मैदान, टिळकनगर

आचार्य उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चेंबूर

‘एन’ विभाग– आचार्य अत्रे मैदान, पंत नगर, घाटकोपर (पूर्व)

माणेकलाल मैदान, नरसी मैदान मार्ग, घाटकोपर (पश्चिम)

‘एस’ विभाग– डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जनता विद्यालयाजवळ, विक्रोळी (पूर्व)

प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान, वर्षा नगर, विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पूर्व)

‘टी’ विभाग– डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान, स्वा. सावरकर रुग्णालयासमोर, मुलुंड (पूर्व)

लाला तुळशीराम उद्यान, बेस्ट बस डेपोच्या समोर, मुलुंड (पश्चिम)

सरदार प्रतापसिंग उद्यान, मुलुंड निमकर सोसायटी, मुलुंड (पश्चिम) धामणगाव महानगरपालिका शाळा मैदान

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content