Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका बालकांना...

मुंबई महापालिका बालकांना देणार मोफत पीसीव्ही लस

मुंबई महापालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरूवात करण्‍यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने व रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे. पालिका क्षेत्रातील १ वर्षाखालील बालकांची संख्‍या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिली.

या लसीकरणाच्‍या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येत असून क्षेत्रीय स्‍तरावर जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती पालिकेच्‍या आरोग्‍य खात्‍याव्‍दारे देण्‍यात आली.

विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. शासनाच्या निर्देशानुसार या लसीकरण मोहिमेत आता आणखी एका नवीन लसीचा अंर्तभाव करण्‍यात आला आहे. या लसीचे नाव ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (पीसीव्ही) असे असून या लसीमुळे न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारापासून संरक्षण मिळू शकणार आहे.

भारतात २०१०मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षांखालील अंदाजे १ लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात ५ ते ६ लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंददेखील झाली होती. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्‍हणजे फुफ्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते. ताप येतो व  खोकलाही येतो. तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, न्युमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.

पीसीव्ही लसीचे वेळापत्रक (Schedule)

पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. २ प्रायमरी डोस वयाच्या ६ आठवड्यात, १४ आठवड्यात आणि १ बूस्टर डोस वयाच्या ९व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्‍या मांडीवर स्‍नायूमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या १ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसींसोबत देण्यात येईल.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content