Homeटॉप स्टोरीसुरूंगशोध व निराकरणासाठी...

सुरूंगशोध व निराकरणासाठी स्वयंचलित जलांतर्गत वाहने विकसित

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरूंगशोध आणि निराकरण मोहिमांसाठी अद्ययावत मानववाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने विकसित केली आहेत. डीआरडीओअंतर्गत विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत सुरूंग प्रतिकार मोहिमांसाठी नव्याने विकसित मानववाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने यशस्वीपणे तयार करण्यात आली आहेत. या प्रणालीत अनेक जलांतर्गत स्वयंचलीत वाहने असून त्यांना साइड स्कॅन सोनार आणि जलांतर्गत कॅमेरे, अशी प्राथमिक सामग्री जोडलेली आहेत. त्यामुळे सुरूंगासारखी वाटणारी वस्तू प्रत्यक्ष कालावधीत ओळखणे शक्य होते. वाहनावर असलेल्या गहन शिक्षणाधारित लक्ष्यओळख अल्गोरिदममुळे स्वयंचलित वर्गीकरण करता येते. त्यामुळे संचालकाचा कार्यभार आणि मोहिमेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो.

यात मजबूत जलांतर्गत संप्रेषण प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यवाहीदरम्यान विविध वाहनांमधील माहितीविनिमय सुलभ होते आणि ती परिस्थितीची व्यापकतेची जाणीव करून देते. अलीकडेच नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा/बंदर क्षेत्रात पूर्ण झालेल्या प्रात्यक्षिक चाचण्यांत प्रणालीच्या महत्त्वाच्या तांत्रिक निकषांची आणि निर्णायक मोहिम उद्दिष्टांची यशस्वी पडताळणी केली. अनेक औद्योगिक भागीदार या प्रणालीच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी आहेत. पुढील काही महिन्यांत ती उत्पादनासाठी सज्ज होईल. या प्रणालीमुळे नौदलाच्या सुरूंग युद्धसज्जतेसाठी प्रतिसादक्षमता जलद होईल, असे संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी सांगितले.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content