Homeबॅक पेजऑडी इंडियाकडून २०२३-२४मध्‍ये...

ऑडी इंडियाकडून २०२३-२४मध्‍ये ७ हजारांहून जास्त मोटारींची विक्री

ऑडी, या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४मध्‍ये ७,०२७ युनिट्सची विक्री केली आहे. यामुळे ऑडीच्या विक्रीत एकूण ३३ टक्‍के वाढ झाली आहे. ब्रॅण्‍डने २०२४च्‍या पहिल्‍या तिमाहीत गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत प्रामुख्‍याने पुरवठा साखळीमध्‍ये अडथळे असतानादेखील विक्रीसंदर्भात आव्‍हानांचा सामना करत १,०४६ युनिट्सची विक्री केली.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले की, आम्‍हाला वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओमुळे आर्थिक वर्ष २०२३-२४मध्‍ये ३३ टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ करण्यात यश आले. आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओला प्रबळ मागणी मिळत आहे, जेथे आम्‍ही पुरवठ्यासंदर्भातील आव्‍हानांवर मात करण्‍यासाठी सज्‍ज आहोत. २०२३मधील विक्रमी विक्रीच्‍या आधारावर लक्‍झरी बाजारपेठेत सुरू असलेल्‍या विकासासह आम्‍हाला २०२४मध्‍ये ५०,००० कार्सच्‍या विक्रीचा टप्‍पा पार करण्‍याच्‍या उद्योगाच्‍या क्षमतेबाबत विश्वास आहे.

ऑडी

ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आर्थिक वर्ष २०२३-२४मध्‍ये ५० टक्‍क्‍यांची वाढ केली. जानेवारी ते मार्च २०२४ कालावधीदरम्‍यान ऑडी अप्रूव्‍ह्ड प्‍लसने २५ टक्‍यांच्‍या प्रबळ वाढीची नोंद केली. सध्‍या देशभरातील सर्व प्रमुख ठिकाणी २६ ऑडी अप्रूव्‍ह्ड प्‍लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड विस्‍तार करत राहिल आणि यंदा चार अधिक पूर्व-मालकीच्‍या कार सुविधांची भर करेल.

ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी. 

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content