Homeमुंबई स्पेशलसिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या...

सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा सोमवारी लिलाव

मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात “श्री”चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा (श्रीगणेश प्रतिमा, लॉकेटस, मोदक, अंगठया, सोन्याच्या साखळया, हार इ.) जाहीर लिलाव सोमवार, दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सांयकाळी ५.०० या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावादिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. सदर प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमाप्रमाणे होईल. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. श्रीसिध्दिविनायकाच्या सर्व भक्तांनी या लिलावात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content