Homeएनसर्कलगुंतवणूकदारांसाठी लवकरच ‘आत्मनिर्भर...

गुंतवणूकदारांसाठी लवकरच ‘आत्मनिर्भर निवेशक मित्र’!

देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, हस्तांतरण व सोयीसाठी तसेच माहितीचा प्रसार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी आत्मनिर्भर निवेशक मित्र, या समर्पित डिजिटल पोर्टलला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे.

पोर्टल सध्या चाचणी टप्प्यात असून अंतिमतः 15 मे 2021पर्यंत उद्घाटनासाठी सज्ज होईल. वेबपृष्ठ उचित समयी प्रादेशिक भाषा आणि मोबाइल अॅपमध्येदेखील उपलब्ध असेल. या पोर्टलवर इन्व्हेस्ट इंडिया येथे एक समर्पित डिजिटल गुंतवणुकीच्या प्रसारासाठी आणि सुविधेसाठी एक चमू असेल जो घरगुती गुंतवणूकदारांना थेट इन्व्हेस्ट इंडिया तज्ज्ञांशी संपर्क साधण्यास किंवा विनंती करण्यास मदत करेल आणि त्यांच्या विशिष्ट गुंतवणूकीवर / व्यवसाय संबंधित बाबींवर चर्चा करेल.

आत्मनिर्भर निवेशक मित्र पोर्टलची वैशिष्ट्ये: 

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविषयी आणि नवीन उपक्रमांविषयी दैनंदिन सद्यस्थिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • इन्व्हेस्ट इंडिया तज्ज्ञांबरोबर थेट बैठक आणि चर्चा जी देशांतर्गत गुंतवणूकदारांना पुरेशा सुविधेची खात्री देईल आणि ठराव जारी करेल.
  • प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बोट.
  • चॅम्पियन्स पोर्टल, एमएसएमई समाधान, एमएसएमई संपर्क इ.सारख्या सर्व एमएसएमई पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी एकच ठिकाण.
  • आपल्या व्यवसायाला लागू असलेल्या मंजुरी, परवाने व परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • विविध क्षेत्र आणि राज्यात प्रोत्साहन आणि योजना यांचे अन्वेषण आणि तुलना करणे शक्य.
  • उत्पादन क्लस्टर आणि जमीन उपलब्धतेविषयी माहिती.
  • वेगवेगळ्या क्षेत्रात, उपक्षेत्रात आणि राज्यांमध्ये गुंतवणूक संधी शोधा.
  • भारतात व्यवसाय करण्याच्या प्रक्रियेचे परीक्षण करा (क्रमाक्रमाने उपाय).
  • भारतातील बंधपत्रित उत्पादन योजनांची माहिती आणि सहकार्य.
  • भारतात लागू होणारे कर आणि करप्रणालीबद्दल अधिक जाणून घ्या.  
  • चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि बी 2 बी (विविध व्यवसाय) मंचाची माहिती.
  • केंद्रीय मंत्रालये, उद्योग संघटना, राज्य विभाग यांच्यासारख्या विविध हितधारकांशी एकाच व्यासपीठावर संपर्क साधा.
  • भारत सरकारच्या निविदा पोर्टलशी लिंक करून सर्व केंद्र व राज्य निविदांची माहिती.
  • सर्व राज्यांची त्यांची धोरणे, आपली मंजुरी, विभाग आणि मुख्य अधिकारी इत्यादी माहिती जाणून घ्या.
  • नॅशनल सिंगल विंडो, स्टार्टअप इंडिया, ओडीओपी, पीएमजी, एनआयपी इत्यादींसारख्या उपक्रमांशी प्लॅटफॉर्म जोडणे.

हा प्रकल्प “इन्व्हेस्ट इंडिया” एजन्सीच्या अंतर्गत आहे जो 2009मध्ये भारत सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागांतर्गत ना-नफा ना तोटा तत्त्वावरील उपक्रम म्हणून स्थापन केला गेला होता.

04 मार्च 2021 रोजी इन्व्हेस्ट इंडियाच्या गुंतवणूक तज्ज्ञांनी देशांतर्गत कंपन्यांकडील 2,34,399 व्यवसाय विनंत्या सुलभ केल्या आहेत. देशांतर्गत गुंतवणूकदारांची सोय हा इन्व्हेस्ट इंडियामधील महत्त्वाचा भाग आहे आणि यात सर्व गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

जागतिक गुंतवणूकदारांच्या समर्थनाचा विचार करता इन्व्हेस्ट इंडियाने 162 देशांच्या 29,812 व्यवसाय विनंत्यांना मदत केली आहे. गुंतवणूकदारांना मौल्यवान दर्जेदार सेवा पुरविल्याबद्दल यूएनसीटीएडीकडून इन्व्हेस्ट इंडियाची दखल घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा एजन्सी म्हणून, “इन्व्हेस्ट इंडिया” क्षेत्र -विशिष्ट गुंतवणूकदारांना लक्ष्य करुन आणि भारतातील शाश्वत गुंतवणूक सक्षम करण्यासाठी नवीन भागीदारी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content