Homeचिट चॅटभारतातल्या शेवटच्या गावात...

भारतातल्या शेवटच्या गावात सुरू झाली एटीएम सेवा!

भारतातली आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये आर्थिक सेवा सुरू केल्या आहेत. या गावात आजवर एटीएम सुविधाही नव्हतीआज त्याठिकाणी स्पाइस मनीने मिनी-एटीएम सेवा सुरू केल्या आहेत.

चितकुल गावात फक्त दोन किराणा दुकाने आहेत. त्यापैकी एकाला कंपनीने स्पाइस मनी डिजिटल दुकानबनवले आहे. गावकरी आणि याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या स्पाइस मनी डिजिटल दुकानात कॅश-इन, कॅश-आऊट सेवा मिळतील. आर्थिक समावेश आणि भारतात एटीएम नेटवर्क अधिक सक्षम बनवण्याचे स्पाइस मनीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

शहरी वर्दळीपासून दूरनिवांत हिमाचल प्रदेशातील किन्नौर-कैलास परिसरात हे गाव वसले आहे. एक अतिशय सुरम्य गाव चितकुलयेथील लोकसंख्या जवळपास ९०० असून गावात २०-२५ हॉलिडे रिसॉर्ट्स आहेत. या गावात येणाऱ्या पर्यटकांचा तिथे पाहुणचार केला जातो. चितकुलपासून सर्वात जवळ असलेले एटीएम तब्बल २५ किमी दूर असलेल्या सांगलामध्ये आहे. इंटरनेट कनेक्टिविटी खराब असल्याकारणाने ई-बँकिंग सेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.

साहजिकच हे गाव गेली अनेक वर्षे रोख रक्कम आणि अदायगी सेवांच्या उपलब्धतेच्या बाबतीत अनेक आव्हाने झेलत आहे. यामुळे बऱ्याच समस्या उभ्या राहतात आणि गावाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होत आला आहे. स्पाइस मनीने आपल्या डिजिटली सक्षम आर्थिक सेवांसह या समस्येवर तोडगा शोधून काढला. त्यांनी येथील किराणा दुकानाच्या मालकाला स्पाइस मनी अधिकारी बनवूनकोणताही खर्च होऊ न देता त्यांना डिजिटल दुकान सुरू करून दिले आहे.  आता हे डिजिटल दुकान रोख रक्कम काढणे व जमा करणे या पायाभूत सेवा प्रदान करणारे एटीएम केंद्र म्हणून कार्यरत आहे. स्पाइस मनी मिनी-एटीएममध्ये सर्व प्रमुख बँकांची डेबिट व क्रेडिट कार्ड्स स्वीकारली जातात.

स्पाइस मनीचे सीईओ संजीव कुमार यांनी सांगितले कीग्रामीण भारतात रोख अर्थव्यवस्थेवर भर असतो. परंतु एटीएम आणि मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे गावांमध्ये रोख रकमेची खूप कमतरता भासते. स्पाइस मनीमध्ये आमचे उद्दीष्ट आहे कीभारताच्या कानाकोपऱ्यांमधील सर्वात छोट्या गावांना आणि शहरांना सक्षम बनवले जावे आणि त्याठिकाणी एटीएम सेवा सुरू केल्या जाव्यात.

मिनी एटीएम सेवा, अदायगी, पर्यटन व प्रवास सेवा प्रदान करण्यासाठी अधिक जास्त वितरकांना सोबत घेऊन हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये स्पाइस मनी अधिकारी नेटवर्कच्या विस्ताराची योजना कंपनीने आखलेली आहे.  सध्या ५,००,००० पेक्षा जास्त अधिकारी (व्यापारी/व्यावसायिक) स्पाइस मनी नेटवर्कमध्ये सहभागी असून त्यांच्यापैकी जवळपास ९०% हे निम-शहरी व ग्रामीण भारतात आहेत.  या नेटवर्कसोबत स्पाइस मनी भारतात १८,००० पेक्षा जास्त पिन कोड्स, ७०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आणि ५,००० पेक्षा जास्त ब्लॉक्सना सेवा प्रदान करत आहे.

स्पाइस मनी भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी आहे, जिचे ५,००,००० पेक्षा जास्त अधिकारी (व्यावसायिक) रोख रक्कम जमा करणे, आधारमार्फत रोख रक्कम काढणे, मिनी एटीएम, विमा, कर्ज, बिलांची अदायगी, ग्राहक/एजंट्स/एनबीएफसी/बँकांसाठी कॅश कलेक्शन सेंटर, रिचार्ज, पर्यटन व प्रवास, ऑनलाईन खरेदी, पॅन कार्ड व एमपीओएस सेवा प्रदान करतात.  त्यांचे ९०% पेक्षा जास्त नेटवर्क निम-शहरी व ग्रामीण भारतात आहे.  स्पाइस मनी ऍप (अधिकारी ऍप) व वेब पोर्टलमार्फत स्पाइस मनीच्या सेवांचा लाभ घेता येतो.  युजर्सना सहज वापरता येईल असे इंटरफेस आणि उत्तम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असलेल्या या ऍपला गूगल प्ले स्टोरवर ४.४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- https://spicemoney.com

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content