Homeएनसर्कलसेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स...

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स खरेदी करताय?

भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड म्हणजेच सेकंड हॅण्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा. अशी टू-व्हीलर शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेकवेळा अशा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही त्यांच्या पदरी निराशा पडते.

वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे. पण, असे असूनही ग्राहकांना छोट्या-मोठ्या डीलर्सबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सेकंड हॅण्ड किंवा यूज्ड टू-व्हीलर्सची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताहेत (CredR) क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, शशीधर नंदिगम.

कंपनी प्रतिष्ठित हवी: इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची सेकंड हॅण्ड दुचाकी वाजवी किंमतीत विकत घेऊ पाहणाऱ्यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सारे एकाच ठिकाणी देऊ शकणाऱ्या कंपनी/ब्रॅण्डचीच दुचाकी खरेदी करायला हवी.

बजेट आखा: यूजर्सनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना अत्यंत स्वस्त दरात मिळणारी तसेच त्यासोबत अतिरिक्त कर, अवमूल्यन असे कोणतेही इतर घटक त्यात अंतर्भूत नसतील अशी दुचाकी विकत घेण्याचा विचार करावा. तसेच आपले बजेट ठरवताना दर्जा, बाइकचे वय, ब्रॅण्डचे मूल्य आणि आपल्याला हव्या असलेल्या टू-व्हीलरची उपलब्धता अशा इतर घटकांचाही विचार केला पाहिजे.

अभ्यास करा: यूज्ड टू-व्हीलर्स विकत घेऊ पाहणाऱ्यांनी ऑनलाइन तसेच सेलर्सच्या माध्यमातून या विषयाची माहिती शोधली पाहिजे व या खरेदीसाठी वास्तविक, प्रत्यक्षात उतरवता येतील अशा अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण, कोणतेही टू-व्हीलर्सचे कोणतेही मॉडेल/ब्रॅण्ड त्यांच्या गरजांशी तंतोतंत जुळणारे असू शकत नाही. शिवाय इतर सेलर्सबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, रिव्ह्यू स्कोअर्सही तपासून घ्यायला हवेत. चांगले रेटिंग आणि ऑनलाइन मंचावर ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळविणाऱ्या यूज्ड टू-व्हीलर ब्रॅण्ड्सकडून खरेदी करणे केव्हाही चांगले.

घोटाळ्यांपासून सावध राहा: भारतातील वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ अजूनही खूपच असंघटित आहे. तेव्हा घोटाळेबाज, फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. इथे ग्राहकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून किंवा रस्त्यावरच्या छोट्या-मोठ्या डीलर्सऐवजी प्रमाणित, एखाद्या प्रतिष्ठित विक्रेता संस्थेचे नाव असणाऱ्या सेलर्सकडूनची अशा दुचाकी विकत घेण्याची खबरदारी घ्यायला हवी.

होम टेस्ट राइड: खरेदीचा व्यवहार पक्का करण्याआधी ग्राहकाने गाडीची ट्रायल रन घेण्याचा विचार करायला हवा. यामुळे आपण निवडलेली दुचाकी चालविण्यासाठी किती आरामशीर आहे, तिची रस्त्यावरची कामगिरी कशी आहे, ब्रेक्स आणि इतर घटकांचे यांत्रिक कार्य कसे चालते या सर्व बारकाईने पाहावयाच्या गोष्टींची कल्पना येते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात संघटित क्षेत्रातील टू-व्हीलर कंपन्या बाइक्सची होम डिलिव्हरी तसेच कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीही करत आहेत. ग्राहकांना अशा सेवांचा आवर्जून वापर केला पाहिजे.

कागदपत्रांची पडताळणी: सेकंड हॅण्ड बाइक विकत घेण्यापूर्वी विमा, आरसी बुक, चॅसिस नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि प्रदूषण प्रमाणपत्र या सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. गाडीवर आधी घेतलेले कर्ज असेल तर बँक हायपॉथिकेशन सर्टिफिकेट असायलाच हवे. आरटीओमध्ये पैसे भरून गाडीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यास तुम्ही निवडलेल्या टू-व्हीलरच्या विरुद्ध नियमभंगांचे कोणते गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत किंवा नाहीत हेही कळू शकेल. सध्याच्या काळात, डुप्लिकेट कागदपत्रे मिळविणे अतिशय सोपे झाले आहे, त्यामुळे अशी कागदपत्रे देऊन सेलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अत्यंत बारकाईने पडताळणी करायला हवी.

वॉरंटीचा कालावधी/विक्रीनंतरचे लाभ: सेकंड हॅण्ड दुचाकीचा पर्याय निवडताना वॉरंटी संपण्याची तारीख आणि एक्स्चेंजची सुविधा किती काळापर्यंत लागू आहे हे तपासून घेणे चांगले. अशा मुद्दयांची स्पष्टपणे पडताळणी करून घेतली असेल तर खरेदी केलेल्या बाइकचा दर्जा असमाधनकारक वाटल्यास तुम्ही ती परत करू शकता किंवा तिच्या बदल्यात नवीन टू-व्हीलर घेऊ शकता.

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content