Homeमुंबई स्पेशलआर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिली...

आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिली राणीबागेला भेट

मुंबईतल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या 25 विद्यार्थ्यांनी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, राणीबाग येथे भेट दिली. यावेळी 160 वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या उद्यानातील वास्तूशास्त्रविषयक रचना व कार्यपद्धती, उद्यानविषयक नवनवीन संकल्पना, वृक्षसंपदा व उद्यानाविषयी इतर माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली, अशी माहिती उद्यान विभागप्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मनपा उद्यान विभागाच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन अनेक विद्यार्थी, कॉलेजेस उद्यान विभागात इंटर्नशिपसाठी उत्सुक असतात. बृहन्मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने पर्यावरणपूरक अशा नवनवीन कल्पना जसे की मियावाकी पद्धतीने कमी जागेत झाडांची लागवड करणे, गच्चीवरील उद्यान निर्मिती, भिंतीवरील बागा (vertical garden) खुल्या जागेतील व्यायाम शाळा, वृक्षसंजीवनी अभियान, वापरलेल्या प्लास्टिकपासून उद्यानातील बाकडे  असे एक ना अनेक उपक्रम सीएसआरच्या माध्यमातून उद्यान विभागामार्फत सुरू असतात.

उद्यान विभागाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे उद्यान विभागाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर याअगोदरच नोंद झालेली आहे. मुंबई शहरास अत्यंत प्रतिष्ठेचा असा जागतिक वृक्षनगरी 2022 व 2023चा किताब प्राप्त झाला आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content