Homeमुंबई स्पेशलपसंतीच्या वाहनक्रमांकासाठी उद्या...

पसंतीच्या वाहनक्रमांकासाठी उद्या दुपारपर्यंतचा वेळ

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेतर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत असून या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेतर वाहनांसाठी पसंतीचा विशिष्ट क्रमांक आरक्षित करण्यात येत असून त्याकरीता उद्या दुपारपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी या नविन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्ष‍ित करावयाचा असेल, त्यांना विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (CENTRAL) किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काच्या धनाकर्षासह उद्या, 18 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे सादर करावा. विहीत शुल्क भरून नमुन्यातील अर्ज खिडकी क्रमांक ई-18वर मंगेश मोरे यांच्याकडून प्राप्त करून घेता येईल.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीचा त्याच दिवशी दुपारी 2 वाजता अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल. या आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता 30 दिवसांकरीता असते. या क्रमांकावर 30 दिवसांच्या आत वाहननोंदणी होणे आवश्यक असते. वाहनक्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एंट्रीच्या वेळी वाहन 4.0 प्रणालीमध्ये घेतल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतो, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य)चे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी कळवले आहे. 

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content