Homeटॉप स्टोरी‘अन्वय नाईक’ची १९...

‘अन्वय नाईक’ची १९ घरे उद्धव ठाकरेंकडे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने २१ मार्च २०१४ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबागजवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी विकत घेतल्या. यावर पाच कोटींच्या किमतीची १९ घरे होती. या घरांची मालकी नेमकी कोणाची, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी आज केला.

किरीट सोमैया यांनी आज कोर्लई गावात जाऊन याबाबत अधिक माहिती घेतली. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायततलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न त्यांनी नंतर उपस्थित केले.

१२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार यासंबंधीची माहिती दिली होती. अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याचे अ‍ॅग्रिमेंट, ट्रान्सफरव सगळे पेपरवर्क पूर्ण झाले. परंतु, या जमिनीवर १९ घरे, ज्यांचे बांधकाम ५५० चौरस फुटांपासून २५०० चौरस फुटापर्यंतचे होते/आहेत, असे ठाकरे व नाईक परिवाराची कागदपत्रे पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-१०पासून ही घरे त्या जमिनीवर अस्तित्त्वात आहेत. या १९ घरांचे एकूण बांधकाम २३५०० चौरस फूट आहे. याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर रेटप्रमाणे पाच कोटी २९ लाख रूपये मूल्य आहे. २१ मार्च २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या. परंतु १३ नोव्हेंबर २०२०पर्यंत म्हणजेच आम्ही हे जाहीर करेपर्यंत ही घरे कै. अन्वय नाईक यांच्या नावाने ग्रामपंचायतीत होती, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच कोटींची ही १९ घरे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९-२०, २०-२१चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म ८ व अन्य रेकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही. त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याच्या अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव ७ जून २०१९च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतु, तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर २०२०नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईक यांची १९ घरे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे सहा वर्षे बेनामी संपत्ती म्हणून ठेवून होते का, असा सवालही सौमैया यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८मध्ये झाला. परंतु, उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार २०२० नोव्हेंबरमध्ये किंवा त्या काळामध्ये झाला. याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधांविषयी स्पष्टता करावी, अशी मागणीही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content