Homeबॅक पेज.. आणि तटरक्षक...

.. आणि तटरक्षक दलाने वाचवले मच्छिमाराचे प्राण!

केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.

समुद्रात पडून वाहून जात असलेल्या या मच्छिमाराचे प्राण नौकेवरील खलाशांनी वाचवले होते, मात्र फुफ्फुसात जास्त पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर मच्छिमार नौकेने वैद्यकीय मदतीसाठी दिलेल्या आपत्कालीन हाकेला भारतीय तटरक्षक दलाने प्रतिसाद दिला आणि कोची येथून आर्यमन आणि C-404 जहाजे, तसेच वैद्यकीय पथकासह हलकी प्रगत हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी रवाना केली.

भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या मच्छिमार नौकेचा शोध घेतला आणि नौकेवरील रुग्णाला हवाईमार्गे कोची येथे नेले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षामा’ या आपल्या ब्रीदवाक्याला अनुसरून जलद आणि तत्परतेने समन्वय साधल्याने समुद्रामध्ये मृत्यूशी झुंजत असलेल्या मच्छिमाराचे प्राण वाचले. 

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content