Homeमुंबई स्पेशलअमृता फडणवीस बॅक...

अमृता फडणवीस बॅक इन एक्शन!

अनिक्षा जयसिंघानी यांच्या माध्यमातून अडचणीत आल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून जरा अंतर ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांनी यंदा श्रावणात मात्र आपला पूर्वीचा अंदाज दाखवून दिला. ‘ती’ फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत वर्सोवा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे” या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या.

“मंगळागौर” म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा. वर्सोव्यात सर्व जातीधर्माचे नागरिक राहतात. महिलांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविता यावे यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार व ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कित्येक महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content