Homeचिट चॅटकुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि द्वितीय श्रेणी गटात पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी या संघांनी विजेतेपदाचा मान मिळविला.

प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिकाने चुनाभट्टी येथील भानवे अकादमीचा ३० विरुध्द १४ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या शुभम दिडवाघने तुफानी चढाया केल्या. तर भानवेच्या करणसिंगने झकास पकडी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांची स्पर्धेतील अनुक्रमे सर्वोत्तम चढाई आणि पकडपटू म्हणून निवड‌‌ करण्यात आली. व्दितीय श्रेणी पुरुष गटाचे‌ जेतेपद मिळवताना पंढरीनाथने कुर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळाचा २८ विरुध्द ५ गुणांनी दणदणीत पराभव केला.

विजयी संघाचा ओमकार कदम चमकला. पराभूत संघाच्या सौरभ घागची लढत एकाकी ठरली. त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिकाने शूर संभाजीचा तर भानवेने शितलादेवीचा पराभव केला. व्दितीय श्रेणी पुरुष गटात अंतिम फेरी गाठताना पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बाॅईजचा पराभव केला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता. विजेत्या, उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि आर्कषक चषक भेट देण्यात आले. स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अथक मेहनत घेतली.

Continue reading

शहापूरच्या कन्या सुजाता मडकेंची यशस्वी झेप, सरनाईकांकडून प्रशंसा

“यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत...

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात...

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...
Skip to content