Thursday, March 6, 2025
Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः आकांक्षा, घुफ्रानची बाजी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतल्या महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी कुमारीला सहज नमवून विजेतेपद पटकाविले. तर, पुरुषांच्या अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्याच विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये पहिला सेट ११-२५ हरल्यानंतरदेखील पुढील दोन सेट २५-११ व २५-१५ असे जिंकून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केले.

अंतिम सामन्यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मुंबई क्लस्टर १चे प्रमुख गुंजन सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकास धारियाने मुंबईच्या अमोल सावर्डेकरवर सहज मात केली. घुफ्रानने मुंबईच्या माजी विश्व्विजेत्या प्रशांत मोरेला कडव्या लढतीनंतर नमवले होते. महिलांमध्ये विजेत्या आकांक्षाने उपांत्य लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेला तीन सेटमध्ये  हरविले. रिंकीने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुभवी राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरला सहज नमवले.

विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान, सल्लागार सुरिंदर शर्मा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक चेंबूरचे शाखाधिकारी मंदार चाचड, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मॅनेजर मोहित नारंग यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहचिटणीस केतन चिखले, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.

Continue reading

आशियाई स्पर्धेसाठी मुंबई श्रीच्या खेळाडूंना खानविलकरांचे आर्थिक पाठबळ

भारतातील सर्वात सक्रिय आणि कार्यरत जिल्हा संघटना असा लौकिक असलेल्या बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेला आणि संघटनेशी संलग्नन खेळाडूंना बलशाली बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणारे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी ७ मार्चला होणार्‍या मुंबई श्री...

‘अशी ही जमवा जमवी’चं पोस्टर प्रदर्शित!

चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट"द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी...

‘आरडी’तलं धमाल गाणं ‘वढ पाचची..’ लाँच

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील 'आरडी' चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं "वढ पाचची.." हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "वढ पाचची" हे अतिशय धमाल...
Skip to content