Homeमुंबई स्पेशलशिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत...

शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत अजितदादा घेणार राष्ट्रवादीचा मेळावा!

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

अजित

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे. त्यानंतर १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

अजित

आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पदांच्या नियुक्त्या, बुथ कमिट्या नियुक्ती, याशिवाय जिल्हयाची देण्यात आलेली जबाबदारी याबाबत माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी घेण्यात आली. आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाठीही मेळावे घेणार आहोत असेही तटकरे यांनी सांगितले.

अजित

युवकांचे मेळावेही राज्यभर घेणार आहोत यादृष्टीकोनातून विचारमंथन व वाटचाल करण्यासाठी राज्यभरातील पदाधिकार्‍यांची आज मॅरेथॉन बैठक पार पडली. काही प्रसिद्धीसाठी हपापलेल्या व्यक्ती स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. येणाऱ्या काळात एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत हा निर्णय आमचा पूर्वीच ठरला आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content