लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात तळ ठोकला आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्वे नगर, कोथरूड येथे वारकरी मेळावा पार पडला. याप्रसंगी अजितदादांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एकीकडे अजितदादांचे असे हे मेळावे चालू आहेत तर बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

मन जुळलेली महायुती..!
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवार म्हणून संपूर्ण मतदारसंघात महायुतीच्या एकजुटीचा अनुभव घेत आहे. तोच अनुभव अधिक समृद्ध करणारी बाब म्हणजे आज पुणे येथील शिवसेना भवनास त्यांनी दिलेली सदिच्छा भेट. सारसबाग येथे असणाऱ्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली तेव्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी आपुलकीने, आपलेपणाने स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ताकदीने खंबीरपणे एकजुटीने पहिल्या आघाडीवर लढत आहेत. अशा लढवय्या सैनिकांचे आदरादितथ्यही याठिकाणी त्यांनी अनुभवले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे, शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे प्रमुख आणि पुण्याचे उपशहर प्रमुख सुधीरभाऊ कुरुमकर, महिला आघाडीच्या शहरप्रमुख पूजाताई रावेतकर, नेहाताई शिंदे, राजेंद्र बडदे, विश्वजीत कुमावत, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्याआधी सुनेत्राताईंनी या कार्यालया शेजारी असणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही केले अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या निमित्ताने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात जाऊन त्यांच्या पुतळ्यासही सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केले. याठिकाणी जनसागर लोटला होता. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत होते. त्यातील एक असणाऱ्या एकता मिसळ उपक्रमास त्यांनी भेट दिली. या उपक्रमांतर्गत मोफत मिसळ उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाचे स्वयंसेवक अत्यंत शिस्तीत हा उपक्रम पार पाडत होते. या ठिकाणी सर्वत्र प्रचंड गर्दी असूनही सर्वजण स्वयंशिस्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत अभिवादन करत होते.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

