Homeन्यूज अँड व्ह्यूजअजित पवार आणि...

अजित पवार आणि त्यांच्या बहिणी! सख्ख्या की सावत्र?

आमदार वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या दोघी माझ्या भगिनी आहेत, असे मी मानतो. त्यामुळे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. पण, दादा तुम्ही सावत्र भावासारखे वागताहात, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी यशोमतीताई, मी सावत्र भाऊ नाही, नुसताच भाऊ आहे आणि तुम्हाला भावासारखी ओवाळणी घालेन, असे आश्वासन दिल्यानंतरही ठाकूर आणि गायकवाड यांचे समाधान झाले नाही.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत उत्तर दिले. त्यावेळी निधीवाटपावरून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या दोन्ही माजी मंत्री असलेल्या आमदारांनी केली. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता न्यायबुद्धीने आपण कर्तव्याचे पालन केले आहे. त्यावर समाधान न झाल्याने वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी उभे राहून अजित पवार यांच्यावर सापत्न वागणुकीचे आरोप सुरूच ठेवले.

अजित

अजित पवार यांच्या उत्तरावर भास्कर जाधव यांनीही आक्षेप घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हसत आहेत आणि ते तुमच्याकरवी आमच्यावर अन्याय करत आहेत, असा आरोप केला. त्यावर अजित पवार यांनी चेहरा गंभीर ठेवत मी माहिती घेतो, असे टिपिकल सरकारी छापाचे उत्तर दिले. त्यानंतरही वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी अजित पवार बोलत असताना उभे राहून आक्षेप घेणे सुरूच ठेवले होते. त्यावर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी बसून बोलणाऱ्या किंवा परवानगी नसताना उभे राहून बोलणाऱ्या सदस्यांना उत्तरे देऊ नका, असे निर्देश अजित पवार यांना दिले. त्यावर हसत हसत अजित पवार म्हणाले, जी आपला आदेश… सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ उडाला.

निधीवाटपावरून सापत्न वागणूक मिळाल्याची तक्रार करताना नाना पटोले यांनी अजित पवारांशी आपले काही वैर नाही, असे सांगितले. एकनाथ शिन्दे गटाच्या आमदारांना अजित पवारांनी त्रास दिला होता, तर त्यात आमच्या काय चुका होत्या, असा प्रश्न काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यावर पटोले ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी फक्त सूचना वाचून दाखवावी, अशी नियमात तरतूद आहे, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष नार्वेकर यांनीही नाना पटोले यांना लक्षात आणून दिले की पटोले तुम्ही कपात सूचना देताना काहीही उल्लेख केलेला नाही तर तुमचे म्हणणे रेकॉर्डवर कसे आणायचे, असा प्रतिप्रश्न केला.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content