राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. यामध्ये राज्य /केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन आणि अभिलेखागार व्यवस्थापन प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि त्यासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याची गरज अधोरेखित केली.
दोन दिवस चाललेल्या या बैठकीत दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या सहभाग घेतला होता, तर हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रतिनिधी दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते. दोन दिवस सुरू असलेल्या या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींनी आपापल्या राज्य
/ केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या दस्तावेजांचे जतन आणि सामायिकीकरण करण्यासाठी आणि वेब-पोर्टलद्वारे त्यांचे संग्रहण करून ही संसाधने सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित दृष्टिकोन स्वीकारण्यावर सर्वांनी सहमती दर्शविली.
प्रतिनिधींनी अभिलेखांच्या डिजिटायझेशनच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यप्रणाली (SOPs) तयार करण्यासाठी नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाचे मार्गदर्शन मागितले. एनएआयच्या सहकार्याने (NAI), राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक अभिलेखागारांचे स्रोतांचे मौखिक रीतीने आणि अपारंपरिक पद्धतीने एकत्रिकरण करणे यासारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यासदेखील राष्ट्रीय पुरालेखपाल समितीने या बैठकीत मान्यता दिली.
पुरालेखपालांच्या राष्ट्रीय समितीची पुढील बैठक या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणार आहे.