Homeकल्चर +हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेत...

हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेत पुण्यातून ‘अहमेव ते वहिदा।’ प्रथम

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या ‘अहमेव ते वहिदा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेच्या ‘तृतीयः’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या ‘वंचते परिवंचते’ या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पुणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक महिमा ठोंबरे (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक डॉ. तन्मय भोळे (तृतीयः).

नाटयलेखन: प्रथम पारितोषिक पं. प्रभाकर भातखंडे (वंचते परिवंचते), द्वितीय पारितोषिक डॉ. तन्मय भोळे (तृतीयः).

प्रकाशयोजना: प्रथम पारितोषिक आर्या शिंगणे (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक चैतन्य गायधनी (वयमेव नान्ये).

नेपथ्य: प्रथम पारितोषिक ऋषिकेश पाटील (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक संदीप पोरे (आहूतयः).

रंगभूषा: प्रथम पारितोषिक स्वरांजली गुंजाळ (वन्दे गणपतिम्), द्वितीय पारितोषिक नरेंद्र वीर (अहमेव ते वहिदा).

उत्कृष्ट अभिनय: रौप्यपदक स्त्री वैदेही मुळ्ये (वंचते परिवंचते), कल्याणी गोखले (ग्रहणमुक्ती) आणि उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष शौनक जोशी (अहमेव हे वहिदा), डॉ. तन्मय भोळे (तृतीयः).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः रेणुका येवलेकर (अहमेव ते वहिदा), यशश्री जोशी (बिन्दुसन्देशः), डॉ. दीपलक्ष्मी भट (दिव्यदानम्), निकिता लोंढे (नारायणी), शर्वरी कानडे (आहूतयः), सागर संत (वयमेव नान्ये), रोहित ताराहर (माधवीयम्), यतिन माझिरे (आकार:), आभिजीत केळकर (त्वमेव केवलं कर्तासि), ऋषिकेश भोसले (वंचते परिवंचते).

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्वाती यज्ञोपवीत, मिताली मुसळे आणि सुहास जोशी यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content