Wednesday, November 13, 2024
Homeडेली पल्सभारत आणि युरोपियन...

भारत आणि युरोपियन कमिशनमध्ये झाला सेमीकंडक्टर क्षेत्रासंबंधी करार!

केंद्र सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधित पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने, झालेल्या सामंजस्य करार अलीकडेच करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाला याची माहिती देण्यात आली.

तपशील :

उद्योग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अनुषंगाने, सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीसाठी भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील सहकार्य बळकट करण्याचा या सामंजस्य कराराचा मानस आहे.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे :

हा सामंजस्य करार स्वाक्षरीच्या तारखेपासून अंमलात येईल आणि जोपर्यंत दोन्ही बाजूंनी या करारनाम्याची  उद्दिष्टे साध्य झाली आहेत याची खात्री करेपर्यंत किंवा एक बाजू  या करारनाम्यांमधील सहभाग थांबवेपर्यंत  हा करार कायम राहू शकेल.

प्रभाव :

जी2जी  आणि बी2बी  ही दोन्ही द्विपक्षीय सहकार्य सेमीकंडक्टर  पुरवठा साखळींच्या लवचिकतेला चालना देण्यासाठी आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी पूरक सामर्थ्याचा लाभ घेता येणार आहे.

पार्श्वभूमी :

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सक्रियपणे काम करत आहे. भारतातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन कार्यक्षेत्राच्या  विकासासाठी एक बळकट आणि शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कार्यक्षेत्राचा  विकास सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आला. सेमीकंडक्टर फॅब्स, डिस्प्ले फॅब्स, कंपाऊंड सेमीकंडक्टर्स / सिलिकॉन फोटोनिक्स / सेन्सर्स / डिस्क्रिट सेमीकंडक्टर्स आणि सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) / आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी) सुविधांच्या स्थापनेसाठी आर्थिक पाठबळ देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन कार्यक्षेत्राच्या विकासासाठी भारताच्या धोरणांना चालना देण्याच्या अनुषंगाने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (डीआयसी) अंतर्गत इंडिया सेमीकंडक्टर अभियानाची   (आयएसएम) स्थापना करण्यात आली आहे.

द्विपक्षीय आणि प्रादेशिक चौकटी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख आणि आघाडीच्या  क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कार्यरत आहे. या उद्देशाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  द्विपक्षीय सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारत विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येण्यासाठी पुरवठा साखळीतील लवचिकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने  विविध देशांच्या समकक्ष संस्था/एजन्सींसोबत सामंजस्य करार/सहकार्य करार/करार केले आहेत.

Continue reading

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...
Skip to content