Homeन्यूज अँड व्ह्यूजचंद्रानंतर शनिवारपासून 'सूर्या'ला...

चंद्रानंतर शनिवारपासून ‘सूर्या’ला गवसणी?

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती  केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

संपूर्ण जग भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उत्सव साजरा करत असताना, सूर्य मोहिमेबद्दल लोकांचे स्वारस्यही अनेक पटींनी वाढले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी मैनपुरी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्राला भूतकाळातील बंधनातून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतला नसता तर हे सर्व शक्य झाले नसते, यासाठी मागील सरकारने पुढाकार घेतला नव्हता, असे सांगत मंत्र्यांनी याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. परिणामी, चार वर्षांच्या अल्प कालावधीत, इस्रोच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ झाली आहे, या क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर गेली आहे आणि भारताच्या उपग्रह प्रक्षेपण सुविधेची विश्वासार्हता अचानक इतकी वाढली आहे की, युरोपियन उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आतापर्यंत भारताने 260 दशलक्ष युरोपेक्षा अधिक आणि अमेरिकन उपग्रह प्रक्षेपणातून भारताने 150 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक जगताचा सन्मान वाढवल्यामुळेच आज आपल्याला सूर्याच्या दिशेने पहिले अंतराळ यान प्रक्षेपित करण्याचा आत्मविश्वास आणि खात्री आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य-एल 1 या अंतराळ मोहिमेमध्ये, सात पेलोडसह (यानांमधील उपकरणे) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा (पीएसएलव्ही) वापर करण्यात येणार आहे, असे  डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट-1(एल 1) भोवती प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाईल. प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाला सूर्याला कोणत्याही ग्रहणाशिवाय सतत पाहण्याचा मोठा फायदा मिळणार आहे, असेही ते म्हणाले. मंगळ आणि चंद्र मोहिमेनंतर आदित्य एल-1 ही तिसरी मोहीम आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जास्रोतांचा अभ्यास केला जाईल.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content