Homeमुंबई स्पेशलशरद पवार आणि...

शरद पवार आणि गौतम अदाणींत २ तास चर्चा

आज सकाळी उद्योगपती गौतम अदाणी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, निवासस्थानी जाऊन जवळजवळ दोन तास चर्चा केली. या चर्चेतला तपशील जाहीर करण्यात आला नाही.

हिंडेनबर्ग अहवालात गौतम अदाणी यांच्या कंपन्यांमधील घोटाळा उघड झाल्यानंतर अदाणी समुहाला जोरदार झटका लागला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. अदाणी समुहाच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, मोदी यांनी आपले अदाणीबरोबरचे संबंध जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर १०-१२ दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अचानक घूमजाव करत न्यायालयीन चौकशी होत असेल तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची गरज नाही, असे वक्तव्य केले. त्या पार्श्वभूमीवर आज दोघांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content