मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
या स्पर्धेत त्यांच्या ऋतुजा जगदाळे, निक्षिता खिल्लारे, अक्षता ढोकळे, अर्ना पाटील, सोनाली बोराडे, यज्ञेश भोस्तेकर, नमन महावर, प्रशांत गोरे, रितेश बोराडे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदके जिंकली. या सर्व पदकविजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक राहुल ससाणे, सुनील रणपिसे, रमेश सुकट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेसाठी पंंच म्हणून योगेश पवार यांची निवड झाली होती. पदकविजेत्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक या सर्वांचे लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक पाटील, विश्वस्त सुबोध आचार्य, आबा डांगे, विनायक कुलकर्णी, हरिश्चंद्र गवस, समन्वयक हीरा मोराळे यांनी खास अभिनंदन केले आहे.