अभिमन्यू उद्धव कोंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवार, या दोघांनाही राजकारणातली सायकल चालवता येते. पण, शरद पवार नावाचा सायकलपटू, तेही पुण्यातल्या रस्त्यांवरून थेट दोन हात सोडून सायकल चालवू शकतो. उद्धव ठाकरेंना मात्र गर्दी नसलेल्या रस्त्यावरून सायकलला दोन्ही हात घट्ट पकडूनदेखील धड सायकल चालविणे अशक्य झाले आहे.
त्यामुळे शरद पवारांनी राज्यातल्या राजकारणात सध्या सर्वाधिक बाजी मारली आहेच. त्याचवेळी त्यांनी त्यांचे एकेकाळचे तगडे स्पर्धक भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना व उद्धव ठाकरे या दोघांनाही एकाचवेळी एकाच खिंडीत गाठून मोठ्या खुबीने चारीमुंड्या चित करून ठेवलेले आहे. फडणवीस पट्टीचे स्वीमर असल्याने नाकातोंडात पाणी गेल्यानंतरही चिखलातल्या पाण्यात कसेबसे पोहोताहेत. पण, उद्धव यांच्या पार नाकातोंडात पाणी गेलेले असल्याने त्यांची आजची अवस्था फक्त आणि फक्त महाभारतातल्या अभिमन्यूसारखी झालेली आहे. नव्हे, ती तशी पवारांनी त्यांची ही अभिमन्यूवस्था करून ठेवलेली आहे.
.. आणि उद्धव अभिमन्यू झाले
शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष आणि पक्षी या बिलंदर, कलंदर नेत्याने एकाच दगडात ठेचून त्या दोघांनाही जखमी करून पवार आरामात आरामखुर्चीवर रेलून गालातल्या गालात हसताहेत आणि उद्धव यांच्या हातून वेळ निघून गेलेली असल्याने ते अभिमन्यूसारखे मोठ्या चक्रव्यूहात अडकले आहेत. चारी बाजूंनी बदमाश हितशत्रूंपासून पूर्णतः कोंडीत पकडले गेलेल्या, एकेकाळच्या या धूर्त व यशस्वी नेत्याची म्हणजे उद्धव ठाकरे यांची मोठी गोची झालेली आहे.

अभिमन्यू उद्धव यांचा ‘लालू’ होणार?
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे हे या राज्यातले पुढले शंभर टक्के लालूप्रसाद यादव असतील हे जे राष्ट्रवादीच्या प्रभावी नेत्यांकडून इतरांना अनेकदा विश्वासात घेऊन किंवा शपथा देऊन सांगितले जाते, ते आता पटू लागले आहे. उद्धवजी हे असेच निर्णय घेत राहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्याला अर्थ आहे, असाच अर्थ त्यातून निघेल किंवा काढावा लागेल. फक्त उद्धव ठाकरे हे एकाचवेळी राजकारणातून संपले आणि तुरुंगात जाऊन बसले हे भलेही लालूंच्या राज्यात सहन केले गेले असेल पण येथे उद्धव आजही बऱ्यापैकी मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत असल्याने त्यांच्यावर इतकी मोठी नामुष्की ओढवेल असे वाटत नाही.
उद्धव यांच्या नेतृत्त्वातली हवाच गेली?
पण, काही सांगताही येत नाही. शरद पवार नेमके कसे व कोणाचे हे उद्धव यांना अजिबात न कळल्याने त्यांनी स्वतःहून स्वतःचा अभिमन्यू करून घेतला असे माझे ठाम मत आहे. ज्या उद्धव सेनेची या महाराष्ट्राला बहुसंख्य जात्यंध मुसलमानांपासून वाचविण्याची गरज होती, विशेष म्हणजे मुसलमान नेत्यांनी आणि शरद पवारांनी या नेत्याच्या नेतृत्त्वातली आधी हवा काढून घेतली आणि मुंबई पूर्णतः बाटविण्याच्या असंख्य जात्यंध मुसलमानांच्या हालचालींना आपोआप जोर आला..
मंगलप्रभात लोढांकडून भाजपाचा वापर?
भाजपातलेच बहुसंख्य, असंख्य, अनेक म्हणतात, अनेक सांगतात की भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक आमदार मंगलप्रभात लोढा हे आजतागायत कायम आपल्या नेतृत्त्वाचा मोठ्या खुबीने फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यवसायासाठी वापर करीत आले आहेत. थोडक्यात, त्यांनी बलाढ्य भाजपा केवळ स्वतःच्या धंद्यासाठी वापरून घेतलेली आहे. ते आजही तिला वापरून घेताहेत. भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बांधकामाच्या धंद्यात भलामोठा तुकडा कमवायचा आणि त्यातला अगदीच छोटासा तुकडा भाजपावर फेकून आपला व्यावसायिक कार्यभाग मोठ्या युक्तीने आणि खुबीने उरकून घ्यायचा, असेही जे मंगलप्रभात लोढा यांच्याविषयी वारंवार सांगितले, बोलले जाते, त्यात कितपत सत्य आहे?

साधी राहणी हे लोढांचे वैशिष्ट्यं..
हा तसा एखाद्याचा मोठा अभ्यासाचा विषय आहे. पण, ज्यांनी कोणी लोढा यांना बघितलेले असेल त्यांचे व माझे त्यांच्याविषयी बनलेले मत नक्की सारखे असेल. म्हणजे, मंगलप्रभात हे या राज्यातले सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतले एक हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणताही नवखा असे सांगू शकणार नाही. एवढे त्यांचे राहणीमान साधे व शांत आहे. असे वाटते जर या महिन्यात त्यांच्या बायकोने साडी घेतली तर पुढल्या वर्षी याच महिन्यात लोढा स्वतःसाठी नवा शर्ट विकत घेत असतील. एवढे त्यांचे राहणीमान साधे आहे.
जगभर पुरून उरतील ते लोढा..
म्हणजे सकाळी खिचडीवर फोडणी आणि संध्याकाळी त्याच खिचडीला फोडणी देऊन लोढा कुटुंबीय कसेबसे दिवस काढत असतील, आला दिवस पुढे ढकलत असतील असे नक्की त्यांच्याकडे बघणाऱ्याला वाटत असावे. पण, हेच लोढा त्यांच्या धंद्यातले बाप माणूस म्हणूनच ओळखले जातात, नव्हे ते या धंद्यात साऱ्यांना, तेही जगभर पुरून उरतात, एवढे मोठे ते बांधकाम व्यावसायिक आहेत.
आक्रमकतेपुढे माझे लोटांगण
त्यामुळे त्यांच्याकडे या राज्याने कधीही सामान्यांचे नेते म्हणून कधी फारसे सिरियसली बघितलेच नाही. पक्का धंदेवाला म्हणूनच भाजपासहित साऱ्यांनी त्यांच्याकडे याच पद्धतीने बघितले आहे आणि लोढा यांनीही आपला स्वतःचा विधानसभा मतदारसंघ वगळता इतरत्र फडणवीस किंवा शेलार यांच्यासारखी सामान्यांचे नेते अशी आपली इमेज जोपासली किंवा वाढवली नाही. पण याच मंगलप्रभात लोढा यांनी अलीकडे पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेषनात मुंबईतल्या बहुसंख्य जात्यंध मुसलमानांची जी आईबहीण घेतली, त्यांच्या त्या भाषणावर मी सर्वांदेखत किमान शंभर वेळा त्यांच्या पाया पडायला तयार आहे. लोढा तुस्सी ग्रेट हो.. ज्यांनी म्हणून त्यांचे ते त्या दिवशीचे सभागृहातले आवेशपूर्ण, जोशपूर्ण भाषण ऐकले असेल, तेव्हा हेच म्हटले असेल एवढे ते भाषण विखारी, प्रभावी ठरले आहे. कारण लोढा यांनी तसे मुद्दे त्याठिकाणी त्यादिवशी पुराव्यांसहित मांडलेले आहेत..

